शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

पीक विम्याची बनवाबनवी!

By admin | Updated: May 26, 2014 01:07 IST

अतवृष्टी, दुष्काळ व गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटात शेतकर्‍यांच्या पिकाला सुरक्षा कवच मिळावे म्हणून दरवर्षी लाखो शेतकरी पीक विमा काढतात. पण विमा कंपन्या गत अनेकवर्षांंपासून भोळ्य़ाभाबड्या

लाखोंचा प्रीमियम कंपन्यांच्या खिशात : शेतकरी लाभापासून वंचित

नागपूर : अतवृष्टी, दुष्काळ व गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटात शेतकर्‍यांच्या पिकाला सुरक्षा कवच मिळावे म्हणून दरवर्षी लाखो शेतकरी पीक विमा काढतात. पण विमा कंपन्या गत अनेकवर्षांंपासून भोळ्य़ाभाबड्या शेतकर्‍यांशी बनवाबनवी करून सर्रास लुटमार करीत आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गत २0१२ मध्ये खरीप व रबी हंगामात नागपूर जिल्ह्यातील ४ हजार २७९ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला होता. त्यासाठी २३ लाख ५७ हजार रुपयांचा विमा हप्ता जमा केला. पण त्या मोबदल्यात केवळ १२ शेतकर्‍यांना ३३ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. शिवाय २0१३ मध्ये पुन्हा १५ हजार शेतकर्‍यांनी विमा काढला. त्यासाठी १ कोटी १ लाख ४१ हजार रुपयांचा प्रीमियम जमा केला. पण एकाही शेतकर्‍याला नुकसानभरपाई मिळाली नाही. एवढेच नव्हे तर मागील १२ वर्षांंतील आकडेवारी पाहता, काही दोन-चार वर्षांंचा अपवाद वगळता विमा कंपन्यांनी विदर्भातील शेतकर्‍यांना कधीही पुरेपूर नुकसान भरपाई दिलेली दिसून येत नाही. २00१ मध्ये येथील शेतकर्‍यांनी ७ कोटी २१ लाख ६ हजारांचा विमा हप्ता कंपन्यांकडे जमा केला. परंतु नुकसानभरपाई केवळ १ कोटी २0 लाख ८३ हजार रुपयांचीच मिळाली. २00३ मध्ये ३ कोटी ९९ लाख २३ हजार जमा केले असून शेतकर्‍यांना केवळ ११ लाख ८१ हजार रुपयेच देण्यात आले. २00५ मध्ये ४ कोटी ४६ लाख ४३ हजार कंपनीकडे जमा झाले, पण नुकसान भरपाई केवळ ३७ लाख ६९ हजारांची मिळाली. २00६ मध्ये ३ कोटी ७४ लाख ८९ हजार रुपयांचा विमा हप्ता भरण्यात आला. त्या मोबदल्यात शेतकर्‍यांना २ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपये देण्यात आले. २00७ मध्ये २ कोटी १0 लाख ५३ हजार रुपये जमा करण्यात आले. पण शेतकर्‍यांना केवळ २३ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. २0१0 मध्ये ६ कोटी ९८ लाख ७७ हजार रुपयांचा विमा हप्ता जमा झाला असून, वर्ष अखेरीस केवळ १ कोटी १७ लाख ५३ हजारांची नुकसान भरपाई देण्यात आल्याचे दिसून येते.

कृषी विभागाचा प्रस्ताव धूळखात

पीक विमा योजनेचा हेतू उदात्त असला तरी त्याचा शेतकर्‍यांना योग्य लाभ मिळत नसल्याने खुद्द कृषी विभाग चिंता व्यक्त करीत आहे. या योजनेचा थेट शेतकर्‍यांना लाभ मिळावा, यासाठी विभागीय कृषी उपसंचालक कार्यालयाने गतवर्षी एक प्रस्ताव तयार करून तो शासन दरबारी पाठविला असल्याची माहिती एका वरिष्ठ कृषी अधिकार्‍यांनी दिली. या प्रस्तावानुसार विमा हप्त्यांची रक्कम ही विमा कंपन्यांकडे जमा न करता, ती कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत जमा करावी. शिवाय लाभार्थी शेतकर्‍यांना येथूनच थेट नुकसानभरपाई देण्यात यावी. यामुळे विमा कंपन्यांना दरवर्षी होणारा कोट्यावधीचा नफा शासनाच्याच एका विभागाकडे जमा राहील. शिवाय शेतकर्‍यांनाही योग्य लाभ मिळेल, असे सुचविण्यात आले आहे. परंतु कृषी विभागाचा हा प्रस्ताव अजूनही शासन दरबारी धूळखात पडला आहे.

हवामान आधारित विमा हवेत

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गत २0१३ मध्ये जिल्ह्यातील १५६ शेतकर्‍यांनी गहू व हरभरा पिकासाठी पथदर्शक हवामान आधारित पीक विमा काढला होता. यासाठी संबंधित विमा कंपनीच्या खिशात ३ लाख १८ हजार रुपयांचा विमा हप्ता जमा करण्यात आला. मात्र अजूनपर्यंंत एकाही शेतकर्‍याला त्या विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे हा विमा कुणासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विभाग दरवर्षी शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात पीक विमा काढण्याचे आवाहन करतो. परंतु त्याचा शेतकर्‍यांना लाभ मिळावा, यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही.

जनता विमा योजना

एखाद्या शेतकर्‍याला अपघातात अपंगत्व आले किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाची वाताहात होऊ नये, म्हणून राज्य सरकारने बळीराजाला विमा कवच प्रदान केले आहे. सहा वर्षांंपासून राज्यभरात ही योजना राबविली जात आहे; परंतु या योजनेतील लाभार्थींंची संख्या पाहता ती योजना शेतकर्‍यांसाठी की, विमा कंपन्यांचा खिसा भरण्यासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजपर्यंंंतचा अनुभव पाहता, शेतकर्‍यांपेक्षा विमा कंपन्यांनीच आपले उखळ पांढरे करून घेतल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने गत २00६ मध्ये या योजनेचा शुभारंभ केला. सध्या ती ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ नावाने राबविली जात आहे. याअंतर्गंंत दरवर्षी राज्यभरातील कोट्यवधी शेतकर्‍यांचा विमा उतरविला जातो. त्यानुसार २0१२-१३ या वर्षांंंत सरकारने विमा कंपन्यांकडे ३ हजार १५१ लाख रुपयांचा विमा हप्ता जमा करून १ कोटी ३७ लाख शेतकर्‍यांचा विमा काढला होता. या योजनेंतर्गत कोणत्याही शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाला, दोन्ही डोळे वा दोन अवयव निकामी झाले किंवा एक डोळा व एक अवयव निकामी झाला तर त्याला विमा कंपनीकडून १ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. यात सर्पदंशाने झालेला मृत्यू, पाण्यात बुडून झालेला मृत्यू, रेल्वे अपघात, विषबाधा, वीज पडून झालेला मृत्यू, हत्या, जनावरांचा हल्ला किंवा नक्षलवाद्यांकडून हत्या झाली तरी शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतो; पण या योजनेचे वास्तव काही वेगळेच सांगते. गत काही वर्षांंंतील नागपूर जिल्ह्यातील लेखाजोखा पाहता, २00९ ते २0१४ पर्यंंंत येथील एकूण ४८६ शेतकर्‍यांची प्रकरणे विमा कंपन्यांकडे पाठविण्यात आली आहेत; मात्र विमा कंपन्यांनी त्यापैकी केवळ २५९ शेतकर्‍यांनाच विमा लाभ दिला. इतर १७१ शेतकर्‍यांचे दावे फेटाळून लावण्यात आले तर ३४ प्रकरणे अजूनही कंपन्यांकडे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली.