शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

स्वा.सावरकर यांच्या जीवनावरील थ्रीडी शोला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: May 16, 2016 03:03 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ‘लाइट अँड साउंड शो’ प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने जागतिक दर्जाचे थ्रीडी मॅपिंग तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच उपयोगात आणून बनविण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ‘लाइट अँड साउंड शो’ प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या तंत्राने त्यांच्या प्रतिमेची व्यापकता स्मारकाच्या ६६ फूट उंच व ९६ फूट रुंद भिंतीवर अनुभवण्यासाठी सर्व वयोगटातील मंडळी सायंकाळी आठ वाजता स्मारकात एकच गर्दी करत आहेत.अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा नेत्रदीपक कार्यक्रम मुंबईत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल, तसेच तरुण पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख होईल, असा विश्वास स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दृकश्राव्य व त्रिमित पद्धतीने स्मारकाच्या भिंतीवर साकारण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये प्रकाश व ध्वनीचा उपयोग करून स्वातंत्र्यवीर यांच्या क्रांतिकारी जीवनपटातील काही रोमहर्षक अंश सादर केले आहेत. स्मारकाच्या वतीने सर्व पातळ्यांवर कार्य करून त्यांचे विचार सर्व माध्यमातून प्रसारित व प्रचारित करण्याची ही मोहीम या पुढील काळातही कायम राहील, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक भेट देऊन हा कार्यक्रम पाहिला. नामवंत अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी अशा प्रकारचे तंत्र केवळ परदेशातच पाहिले असल्याचे सांगून, असा कार्यक्रम भारतात निर्माण होणे हे खरोखर कौतुकास्पद आहे व आपल्या मुलांसोबत हा आंतरराष्ट्रीय दजार्चा शो पाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)