शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हेल्दी बेबी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 2, 2016 02:21 IST

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्दी बेबी कॅम्पचे रविवारी दादर येथील सूर्यवंशी सभागृहात आयोजन करण्यात आले

मुंबई : जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्दी बेबी कॅम्पचे रविवारी दादर येथील सूर्यवंशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी बालरोग तज्ज्ञांकडून बालकांची मोफत तपासणी करण्यात आली.कॅम्पची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. या वेळी आयएपीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर दलवाई, सचिव डॉ. सुशांत माने, आयएपीएचे माजी अध्यक्ष डॉ. उदय पै, खजिनदार डॉ. बेला वर्मा, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचे भूपेश मालाडकर, नरेश कापदुले, गिरीश परमार आणि मयूर दर्जी उपस्थित होते. बाळांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना, डॉ. समीर दलवाई आणि डॉ. बेला वर्मा यांनी बाळांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? याविषयी पालकांना मार्गदर्शन केले, तर डॉ. सुशांत माने यांनी बालकांच्या आहाराविषयीची माहिती देत, पालकांच्या अनेक शंकांचे निरसन केले. कॅम्पमध्ये उपस्थित बालकांची या वेळी तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, प्रत्येक सहभागी बालकास सहभाग प्रमाणपत्र, जॉन्सनतर्फे हेल्थ किट भेट देण्यात आली. (प्रतिनिधी)।एक वेगळी संकल्पना : जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन हा सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅण्ड आणि सामाजिक बांधिलकी जपत, क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे ‘लोकमत’ यांनी हे पाऊल उचलून वेगळी संकल्पना मांडली आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी यानिमित्ताने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’ यांनी दिली आहे. आयएपी (इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स) ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, जी आरोग्याच्या सुधारणेसाठी आणि बाळांच्या हितासाठी सतत झटत असते.