शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील पत्रकाराला व्हायचे आहे इसिसचा प्रवक्ता

By admin | Updated: August 6, 2015 14:53 IST

भारताचे नागरिकत्व सोडून इसिसचा अधिकृत प्रवक्ता होण्याची इच्छा असल्याची वादग्रस्त पोस्ट जुबेर अहमद खान नामक तरुणाने सोशल मिडीयावर टाकल्याने खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ६ - भारताचे नागरिकत्व सोडून इसिसचा अधिकृत प्रवक्ता होण्याची इच्छा असल्याची वादग्रस्त पोस्ट जुबेर अहमद खान नामक तरुणाने सोशल मिडीयावर टाकल्याने खळबळ माजली आहे. जुबेरने  स्वत:ला पत्रकार म्हटले असून जुबेरची ही पोस्ट व्हायरल झाल्यावर मुंबई पोलिसांनी जुबेरचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. 
याकूब मेमनच्या फाशीपूर्वी व फाशीनंतर जुबेर अहमद खान या तरुणाने फेसबुक व अन्य सोशल मिडीयावर काही पोस्ट टाकल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये त्याने इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल बगदादीचा उल्लेख करत इसिसचा अधिकृत प्रवक्ता होण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. ४ ऑगस्ट रोजी राजधानी एक्सप्रेसने दिल्लीत जाणार असून तिथून इराकच्या दुतावासात जाऊन इसिसमध्ये भरती होण्याचा प्रयत्न करु असे त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एका पोस्टमध्ये जुबेरने याकूब मेमन शहीद झाल्याचा उल्लेखही केला आहे. 
एका सतर्क नागरिकाने मुंबई पोलिसांना जुबेरच्या फेसबुक पोस्टविषयी माहिती दिल्यावर पोलिसांनी जुबेरचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. जुबेर हा नवी मुंबईचा रहिवासी असून त्याला वांद्रे स्थानकापर्यंत ट्रेस करण्यात यश आले होते. मात्र पोलिस तिथे पोहोचेपर्यंत जुबेर पसार होण्यात यशस्वी झाला अशी माहिती एका पोलिस अधिका-याने दिली आहे. मुंबई विद्यापीठातून पब्लिक अॅडमिनीस्ट्रेशनची पदवी व जर्नलिझम आणि मास कम्यूनिकेशनमध्ये पदव्यूत्तर शिक्षण घेतल्याचे जुबेरच्या सोशल मिडीया अकाऊंटमध्ये म्हटले आहे.