शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साखरचौथ गणरायांना भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 21, 2016 03:24 IST

बाप्पांच्या साखरचौथ उत्सवाची सांगता व मिरवणुकीला पेण शहरात सायंकाळी चार वाजल्यापासून प्रारंभ झाला.

पेण : बाप्पांच्या साखरचौथ उत्सवाची सांगता व मिरवणुकीला पेण शहरात सायंकाळी चार वाजल्यापासून प्रारंभ झाला. सार्वजनिक मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी आकर्षक पेहरावासह डीजे, डॉल्बीच्या दणदणाटाला बगल देत पारंपरिक मराठमोळी वाजंत्रीच्या सहाय्याने नाचत, गुलालाची व फुलांची उधळण करीत बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढली. प्रत्येक मंडळाचा रुबाब व मिरवणुकांचा वेगवेगळा थाट होता. दोन दिवसांच्या वास्तव्यानंतर बाप्पांना भावभक्तीपूर्वक निरोप देण्यासाठी मिरवणुका निघाल्या. मंगळवारी शहरातील १३५ तर ग्रामीण विभागात २०० च्या वर अशा ३३५ ते ३५० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.दोन दिवसांच्या उत्सवात प्राणप्रतिष्ठापना केलेल्या एकापेक्षा एक सरस गणेशमूर्ती, मंडळाची आकर्षक आरास, विविध सांस्कृतिक उपक्रमाचा हा उत्सव मोठा पण कालावधी छोटा असे वर्णन करता येईल. यामध्ये अष्टविनायक मित्रमंडळ, महाकाली, प्रेमनगर मित्र मंडळ शहरातील विविध मंडळांच्या विसर्जन मिरवणुका थाटामाटात निघाल्या होत्या. ढोल ताशे पथकांच्या सलामीसह निघालेल्या विसर्जन मिरवणुका मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत पेण शहरात गणेशभक्तांना पहावयास मिळाल्या. (वार्ताहर)>ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूकअलिबाग : सोमवारी जल्लोषात आगमन झालेल्या साखरचौथच्या गणरायाला आज भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सार्वजनिक १९३ आणि ३२५ खासगी गणरायांच्या मूर्तींचा त्यामध्ये समावेश होता. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाची भव्य मिरवणुका काढण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीला साखरचौथच्या गणरायाचे आगमन होेते. विविध सार्वजनिक मंडळांनी रोमहर्षक देखावे उभारले होते. देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती.खासगी गणेशोत्सवाच्या ठिकाणी भजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनाला सुरवात झाली. मिरवणुकीसाठी पर जिल्ह्यातून ढोल पथकांना पाचारण के लेहोते. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. नागोठणे : शिवराम शिंदे मित्रमंडळाच्यावतीने पळस येथील मंदिरात साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बबन शिंदे यांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारच्या सत्रात शक्ती - तुऱ्यांचा नृत्याचा सामना रंगला. मुसळधार पाऊस पडत असतानाही नृत्याच्या कार्यक्र मात खंड न पडता चालूच राहिल्याने रसिकांनीही त्याला उत्स्फूर्त दाद दिली हे या कार्यक्र माचे वैशिष्ट्य ठरले. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने पावसातही ग्रामस्थ सहभागी झाले होते.गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, लहान मुलांचा हरिपाठ, महिला मंडळाचे पारंपरिक नृत्य आदी विविध कार्यक्र म दोन दिवसात घेण्यात आले. भाद्रपद कृ. पंचमीला मंगळवारी सायंकाळी निडी येथील अंबा नदीत विसर्जन सोहळा संपन्न झाला.