शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जगण्यासाठी चिमुकलीची कसरत

By admin | Updated: July 22, 2016 01:28 IST

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन भटकंती करणारे डोंबारी, पोटाची खळगी भरण्यासाठी ठिकठिकाणी ते कसरतीचे खेळ दाखवतात.

रहाटणी : विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन भटकंती करणारे डोंबारी, पोटाची खळगी भरण्यासाठी ठिकठिकाणी ते कसरतीचे खेळ दाखवतात. त्यात अवघी सहा वर्षांची बालिका जीव धोक्यात घालून दोरीवरची कसरत करते. काळजाचा ठोका चुकविणारे तिचे दोरीवरचे खेळ उपस्थितांची टाळ्यांची दाद मिळवून जातात. बक्षीसरूपी शाबासकीही मिळते. मात्र तिच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न चिमुकलीचे खेळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतोे. अगदी सकाळीच एखाद्या रस्त्यावर, चौकात, सोसायटीच्या आवारात ढोलकीचा आवाज सुरू होतो. ढोलकीचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी गर्दी जमू लागते.आई-वडिलांच्या हाता-खांद्यावर खेळण्या-बागडण्याच्या, शाळेत जाण्याच्या वयात चिमुकली जीवावर बेतेल, असे कसरतीचे खेळ करून दाखवते. जमिनीपासून १० फूट उंचीवर काठीच्या साहाय्याने बांधलेल्या दोरीवर चिमुकल्या नैनाचे खेळ पाहण्यासाठी आलेले थबकतात. स्वत:चा तोल सांभाळत कधी दोरीवरून चालायचे, तर कधी दोरीवर एकावर एक रचलेल्या प्लेटवरून चालायचे अशी ही जीवघेणी, चित्तथरारक कसरत नैनाच्या वाट्याला पदोपदी आली आहे. वडील महेंद्र, आई बिलोरी, दोन वर्षांची धाकटी बहीण रुची यांच्याबरोबर पोटाची खळगी भरण्यासाठी नैनाची भटकंती सुरू आहे. छत्तीसगढ प्रांतातील बिलासपूर हे त्यांचे मूळ गाव आहे. उपजीविकेसाठी दुसरे कसलेच साधन नसल्याने या कुटुंबाचा असाच प्रवास सुरू आहे. (वार्ताहर)>शासनाच्या साक्षरता अभियानापासून वंचित वयाच्या एका वर्षापासून नैना कसरतीचे धडे घेत आहे. पोटाच्या प्रश्नामुळे नैनास शाळेत दाखल न केल्याची खंत नैनाचे वडील बोलून दाखवतात. महाराष्ट्र शासन असो की केंद्र शासनाचे साक्षरता अभियान व अन्य समाजोपयोगी उपक्रम समाजातील दुर्लक्षित घटकांना उपयुक्त ठरतात. मात्र, या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाहीत. शैक्षणिक उपक्रम नैनाला कधी कामी येणार, नैनाची ही जीवघेणी कसरत कधी थांबणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.