शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

स्पिफी स्पॅरो क्लब विजेता

By admin | Updated: June 11, 2016 01:44 IST

व्हीसीटी २०१६ चषक टष्ट्वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेत स्पिफी स्पॅरो क्लब संघाने अ‍ॅग्री इगल्स इलेव्हन क्लब संघाचा पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले

पिंपरी : व्हीसीटी २०१६ चषक टष्ट्वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेत स्पिफी स्पॅरो क्लब संघाने अ‍ॅग्री इगल्स इलेव्हन क्लब संघाचा पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धा गहुंजे येथील व्हीडीआर मैदान येथे झाली.छत्रपती राजाराम मंडळ, राहुलदादा तरस युवा मंडळ यांच्या वतीने झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅग्री इगल्स संघाने २० षटकांत सर्व बाद १२३ धावा केल्या. विराज काकडेने १७ चेंडूंत २९, ताहीर मोहंमदने २२ आणि आदित्य कदमने १८ धावा करीत चांगली फलंदाजी केली. स्पिफी स्पॅरो संघाच्या गोलंदाज मयूर टिंगरे याने ४ षटकांत २१ धावा देत ४ गडी बाद केले. विशाल सायलूने ४ षटकांत २७ धावांत २ आणि महेश शिंदेने ४ षटकांत २३ धावांत २ गडी टिपले. विजयासाठी १२४ धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस उतरलेल्या स्पिफी स्पॅरो संघाने १८.४ षटकांत ६ गडी गमावत १२६ धावा करीत सहज विजय मिळविला. अभिषेक आनंद याने ३४ धावांत ४५, सूरज शिंदेने ३३ चेंडूंत ३४ आणि इम्राण पठाणने २३ चेंडूंत ३३ धावा करीत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. इगल्स संघाचा गोलंदाज कुशाल टिंगरेने ३ षटकांत १६ धावा देत ३ गडी बाद केले. योगेश चव्हाणने ४ षटकांत २४ धावांत २ गडी टिपले. (प्रतिनिधी)>शिंदे स्पर्धेचा मानकरीसामन्याचा मानकरी किताब मयूर टिंगरे याने मिळविला. महेश शिंदे स्पर्धेचा मानकरी ठरला. नौशाद शेख उत्कृष्ट फलंदाज, समीर सिंग उत्कृष्ट गोलंदाज आणि इम्रान शेख षटकाराचा मानकरी ठरला. बक्षीस वितरण महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार शंतनू सुगवेकर व युवराज निंबाळकर यांच्या हस्ते झाले.