शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतही आता स्पेलचेकर !

By admin | Updated: February 27, 2016 03:02 IST

इंग्रजी भाषेत टायपिंग करताना एखादा शब्द चुकल्यास लगेचच लाल रेषेने अधोरेखित होऊन स्पेलचेकरच्या माध्यमातून ही चूक सुधारली जाते. मात्र मराठी भाषेत टायपिंग करताना ही सेवा

- स्नेहा मोरे,  मुंबई

इंग्रजी भाषेत टायपिंग करताना एखादा शब्द चुकल्यास लगेचच लाल रेषेने अधोरेखित होऊन स्पेलचेकरच्या माध्यमातून ही चूक सुधारली जाते. मात्र मराठी भाषेत टायपिंग करताना ही सेवा उपलब्ध नाही. नेमकी ही गरज ओळखून राज्य मराठी विकास संस्थेने संगणकीय प्रकल्पांतर्गत मराठी भाषेत ‘स्पेलचेकर’ आणण्याचे ठरविले आहे. या स्पेलचेकरसोबतच संगणकीय कामकाजात मराठी भाषेच्या सुलभतेसाठी विविध नवीन सेवा आणण्यात येणार आहेत.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे या प्रकल्पांतर्गत ‘स्पेलचेकर’, ‘टेक्स्ट टू स्पीच’, ‘स्पीच टू टेक्स्ट’ अशा सेवाही लवकरच मराठी भाषेत सुरू करण्यात येणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक बैठकीत या प्रकल्पांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आखलेल्या ‘लँग्वेज टेक्नोलॉजी व्हिजन : २०१०’ या प्रकल्पामध्ये राज्य मराठी विकास संस्था सहभागी झाली होती. आयआयटी, एनसीएसटी, सी-डॅक या संस्थांबरोबर संगणकीय मराठी भाषेच्या प्रकल्पांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या संस्था सध्या एकत्रित कार्यरत आहे.टाईपरायटर जाऊन संगणक आल्यानंतर मराठीचे लेखन त्यावर होऊ लागले आणि शुद्धलेखनासाठी ‘स्पेलचेकर’ची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली. मातृभाषा मराठीतून शिकलेल्यांनाही बऱ्याचदा ऱ्हस्व आणि दीर्घ अचूक लिहिताना अडचण जाणवते. मात्र, ही अडचण आता लवकरच दूर होऊन मराठीतील ‘स्पेलचेकर’ येणार आहे. स्मार्टफोन्ससह वर्ड, एक्सल आणि अशा इतर सॉफ्टवेअरमध्ये मराठी स्पेलचेकरचा वापर करता येईल. मराठी टायपिंग करताना शुद्धलेखनातील चूक लाल रेषेने अधोरेखित होणार आहे. त्यावर राईट क्लिक करून योग्य शब्द दिसेल, अशा पद्धतीने चुकीचा शब्द सुधारता येईल.‘टेक्स्ट टू स्पीच’, ‘स्पीच टू टेक्स्ट’ या सेवांमध्येसुद्धा अनुक्रमे एखादा शब्द लिहिल्यास तो ऐकू येईल आणि एखादा शब्द बोलल्यास तो लिहिला जाईल, यावरही सध्या वेगाने काम सुरू आहे. भविष्यात, राज्य मराठी विकास संस्थेने तयार केलेले सर्व कोश आणि पुस्तके अ‍ॅपच्या स्वरूपातही आणण्याचा विचार राज्य मराठी विकास संस्थेच्या पातळीवर सुरू आहे. ‘काम वेगाने सुरू’मराठी भाषेतील संगणकीय प्रकल्पांचे प्राथमिक टप्प्यातील काम वेगाने सुरू झाले आहे. या प्रकल्पांच्या परिपूर्णतेसाठी संगणक तज्ज्ञ, भाषा अभ्यासक - संशोधक आणि इतर तज्ज्ञांशीही चर्चा करून या सेवा जास्तीतजास्त सुलभ पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील.- प्रा. डॉ. आनंद काटीकर, प्रभारी संचालक, राज्य मराठी विकास संस्था