शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात महामार्ग रुंदीकरणाला वेग

By admin | Updated: October 3, 2016 03:09 IST

मुंबई - गोवा महामार्गाच्या रखडलेल्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी लवकरच नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- मुंबई - गोवा महामार्गाच्या रखडलेल्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी लवकरच नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. इंदापूर-झाराप मार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुमारे चार हजार ८०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी सहा निविदा मागविण्यात आल्या आहेत. पैकी दोन निविदा बाकी आहेत. २०१८ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. आगामी काळात रस्ते वाहतुकीबरोबरच पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उभ्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमानिमित्त गीते अलिबाग येथे आले होते. यावेळी बैठकीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पळस्पे- इंदापूर पहिल्या टप्प्याचे काम राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. कामाला गती येत नसल्याने राज्य सरकारने तो प्रकल्प केंद्राकडे वर्ग करणे गरजेचे होते, असेही गीते यांनी स्पष्ट केले.रोहा-कोलाड मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. अलिबाग- वडखळ राष्ट्रीय महामार्ग- ६६ च्या चौपदरीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अलिबाग-विरार या कॉरिडोरच्या कामालाही गती देण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.अलिबाग तालुका रेल्वेने जोडण्याबाबत मध्य रेल्वेने परीक्षण, निरीक्षण केले आहे. त्याबाबतच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्रकल्पासाठी सुमारे २८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आरसीएफ कंपनीने टाकलेला लोहमार्ग अस्तित्वात आहे. त्याच मार्गावरून रेल्वे सेवा सुरू करता येते का, याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रसायन मंत्री अनंत कुमार यांच्याबरोबरच बैठक झाली आहे. कुमार यांनी दुहेरी मार्ग करून त्यासाठी खर्च करण्याची तयारी दाखविली आहे, असेही गीते यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई, किशोर जैन, दीपक रानवडे, कमलेश खरवले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. याप्रसंगी आमच्या सोबत, येणाऱ्यांची सोबत घेण्यात येईल. जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी १०० शाळांची निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम रोहा येथे घेण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्यासाठी वोकहार्ट रुग्णालयाच्या माध्यमातून मेडिकल व्हॅन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोचून त्यांना मोफत आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष दिले जाणार आहे. वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जीव गमावावा लागणार नाही. रुग्णांना औषधेही मोफत देण्यात येणार असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले.