शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई तालुक्यात जलसंधारणाच्या चळवळीला गती

By admin | Updated: June 6, 2016 03:23 IST

अंबाजोगाई तालुक्यातील ३४ गावांध्ये लोकसहभागातून सिंचनाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर दररोज ५६०० महिला व ग्रामस्थ श्रमदान करतात. यासाठी ६० लाखांपेक्षा जास्त लोकनिधी जमा झाला आहे.

अविनाश मुडेगांवकर,  अंबाजोगाई (जि. बीड)अंबाजोगाई तालुक्यातील ३४ गावांध्ये लोकसहभागातून सिंचनाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर दररोज ५६०० महिला व ग्रामस्थ श्रमदान करतात. यासाठी ६० लाखांपेक्षा जास्त लोकनिधी जमा झाला आहे. जलसंधारणाला लोकचळवळीचे रुप येत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न सत्यमेव जयतेच्या वॉटर कप स्पर्धेतून साकारण्याच्या मार्गावर आहे.दुष्काळी स्थितीवर ठोस उपाययोजना आखण्यासाठी ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धा अंबाजोगाईत सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेत तालुक्यातील ३४ गावांनी सहभाग नोंदविला आहे. गावांमध्ये लोकसहभागातून श्रमदान व लोकनिधीच्या माध्यमातून सिंचनाची कामे करायची आहेत. यात वृक्ष लागवड, शोषखड्डे, बांधबंदिस्ती, नाला खोलीकरण व सरळीकरण, विहिरी व इंधन विहिरींचे पुर्नभरण या कामांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. ही कामे २० एप्रिल ते ५ जून या कालावधीत पूर्ण करायची आहेत. जी गावे प्राधान्यक्रम देऊन कामे पूर्ण करतील, त्यातील तीन गावांना ५० लाख, ३० लाख व २० लाख रुपये अशी तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सत्यमेव जयतेच्या वॉटर कप स्पर्धेमुळे ३४ गावांना प्रेरणा मिळाली असून, गावोगावी सिंचनाची कामे सुरू आहेत. प्रत्येक गावामध्ये दररोज सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महिला व पुरूष श्रमदानातून कामे करतात. गेल्या महिनाभरापासून या कामांनी गती घेतल्यामुळे अनेक गावांमध्ये बहुतांश कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. लोकसहभागातून व श्रमदानातून सुरू असणाऱ्या या कामांमुळे गावांमध्ये एकजूट निर्माण झाली आहे.