शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेला गती

By admin | Updated: July 13, 2014 00:55 IST

नागपुरातील मेट्रो रेल्वेसंबंधात केंद्र सरकारच्या विविध विभागांद्वारे मागण्यात आलेल्या माहितीचा पूर्ण रिपोर्ट राज्य सरकारने तयार केला आहे. आठवडाभरात हा रिपोर्ट केंद्र सरकारला उपलब्ध करून दिला जाईल.

आठवडाभरात केंद्राला पाठवणार रिपोर्ट : महिनाभरात मंजुरीची शक्यता नागपूर : नागपुरातील मेट्रो रेल्वेसंबंधात केंद्र सरकारच्या विविध विभागांद्वारे मागण्यात आलेल्या माहितीचा पूर्ण रिपोर्ट राज्य सरकारने तयार केला आहे. आठवडाभरात हा रिपोर्ट केंद्र सरकारला उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारच्या कॅबिनेटची मंजुरी आवश्यक राहील. सर्वकाही ठीक राहिले तर महिनाभरात मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन निश्चित होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या मेट्रो रेल्वेला केंद्र सरकारच्या नगररचना विभागाची मंजुरी फेब्रुवारीमध्ये मिळाली. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीपासूनच आचारसंहिता लागू झाली. मेच्या अंतिम आठवड्यात केंद्रात नवीन सरकार स्थापन झाले. त्यानंतर महिनाभर मेट्रोकडे कुणीही लक्ष दिले नाही. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी पुन्हा एकदा मेट्रोच्या फाईलला गती मिळाली. नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)च्या मार्गदर्शनात मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला सुरुवात होईल. केंद्रातील रेल्वे, हायवे, फायनान्स, रस्ते आणि वित्त विभागासह विविध विभागांना मेट्रो प्रकल्पाबाबत काही शंका होत्या. त्यामुळे त्यांनी याबाबत वेगवेगळ्या माहितीची एक रिपोर्ट तयार करून ती राज्य सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने त्याची त्वरित दखल घेऊन नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांना याबाबत द्यावयाच्या माहितीचा रिपोर्ट तयार करण्यास सांगितले. त्यांनी केंद्र सरकारला आवश्यक असलेल्या माहितीचा रिपोर्ट तयार करून राज्य शासनाकडे पाठविला आहे. राज्य सरकार एक आठवड्यात केंद्र सरकारकडे हा अहवाल पाठविणार आहे. (प्रतिनिधी)