शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रूपीच्या थकीत कर्ज वसूलीला येणार गती

By admin | Updated: June 20, 2016 18:36 IST

रुपी को आॅपरेटीव्ह बँकेच्या थकीत कर्ज वसूलीला पुन्हा गती येणार आहे. ही थकीत कर्जवसुली होण्यासाठी राज्य सरकारने या बँकेसाठी विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) मंजूर

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 20 -  रुपी को आॅपरेटीव्ह बँकेच्या थकीत कर्ज वसूलीला पुन्हा गती येणार आहे. ही थकीत कर्जवसुली होण्यासाठी राज्य सरकारने या बँकेसाठी विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) मंजूर केली आहे. याबाबतचा अध्यादेश राज्यशासनाने शनिवारी (दि.18 ) काढला आहे. या अध्यदेशानुसार ही योजना २१ आॅगस्टपर्यंत राहणार असल्याचे राज्यशासनाने स्पष्ट केले. यापूर्वी २१ फेब्रुवारीपर्यंत ही योजना बँकेने राबवली होती. मात्र, त्यातील काही तरतूदीमुळें प्रशासनास आपेक्षीत वसूली करण्यात यश आले नव्हते ही बाब लक्षात घेऊन ही ओटीएस योजना जाहीर करण्यात आली आहे. सहकार खात्याकडून बँकेला परिपत्रक मिळाल्यानंतर त्या दिवसापासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.थकीत कर्जामुळे बँकेवर रिझर्व बँकेने प्रशासक नेमल्यानंतर बँकेने नॉन परफॉर्मिंग असेट्स (एनपीए) कर्जवसुलीसाठी २१ फेब्रुवारीपर्यंत ही योजना राबवली होती. त्यानंतर आतापर्यंत ही योजना बंद होती. ही योजना पुन्हा लागू करण्याबाबत बँकेने प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार राज्य सरकारने योजनेला मंजुरी दिली आहे. बँकेच्या ठेवीदारांची संख्या सुमारे सहा लाख २२ हजार असून ठेवींची रक्कम सुमारे १५१६ कोटी रुपये आहे. बँकेचे अन्य बँकेत विलिनीकरण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या बँकेसाठी मंजूर केलेल्या ओटीएस योजनेनुसार प्रयत्न करूनही एनपीए प्रकरणांमध्ये वसुली झालेली नाही. थकीत कर्जाची वसुली झाल्यास या बँकेचे अन्य बँकेत विलिनीकरण होऊ शकणार आहे. त्यामुळे काही बदल करून पुन्हा ही योजना राबवली जाणार असल्याचे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तर कजर्दार दिलेल्या मुदतीत संपूर्ण रक्कम भरू शकले नाहीत, तर अशा कजर्दारांना पुढील सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्याचा अधिकार प्रशासक मंडळाला राहणार आहे. मात्र संबंधित कजर्खात्यांसाठी 'ओटीएस' मंजुरीच्या तारखेपासून किमान १३ टक्के सरळव्याजाने आकारणी करण्यात येणार आहे.

अशी असेल सुधारीत ओटीएस योजना... -  कर्जदाराकडून स्वीकारण्यात येणारी तडजोड रक्कम ही मुद्दल रक्कमेपेक्षा कमी असणार नाही. - ओटीएस अंतर्गत कजर्दाराने एक महिना मुदतीत सर्व रक्कमेचा भरणा केल्यास, त्यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.-  कजर्दाराने संबंधित रक्कम सहा महिन्यांनी भरल्यास दहा टक्के सरळव्याज, तर १२ महिने मुदतीत भरल्यास १२ टक्के सरळव्याज ओटीएस मंजूर केल्याच्या तारखेपासून आकारले जाणार आहे.