शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सीएसआर प्रकल्पांना गती द्या

By admin | Updated: January 10, 2016 01:25 IST

राज्यातील सीएसआर प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगल विंडो सीएसआर सेल स्थापन करावा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य शासनास केली.

मुंबई : राज्यातील सीएसआर प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगल विंडो सीएसआर सेल स्थापन करावा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य शासनास केली.राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या तसेच वित्तीय संस्था यांचा राज्याच्या विविध विकास तसेच लोककल्याणकारी कामात ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व’च्या माध्यमातून (सीएसआर) सक्रिय पाठिंबा आणि सहभाग मिळवण्यासाठी राजभवनात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ‘महा सीएसआर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपालांनी ही सूचना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह सार्वजनिक- खाजगी उद्योग क्षेत्रातील तसेच वित्तीय संस्थांचे अनेक मान्यवर आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.उद्योगजगताने शासनाच्या जलसंधारण कामात आपला सहभाग नोंदवावा, असे झाल्यास शासन आणि उद्योगजगत यांच्या संयुक्त प्रयत्नातून राज्यात जलस्रोतांचा शाश्वत विकास होण्यास मदत होईल, असा विश्वासही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्तीसीएसआर कार्यक्रमांतर्गत उद्योग जगताकडून शासनाकडे येणाऱ्या विविध प्रकल्पांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी, तसेच त्यांना आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एका विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. उद्योग जगत राज्यात आजही अनेक क्षेत्रात सीएसआर कार्यक्रमांतर्गत लोकोपयोगी कामे करीत आहे. या पार्श्वभूमीवर सीएसआर प्रकल्पांसाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.