शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

विशेष विद्यार्थ्यांचे बारावीत घवघवीत यश

By admin | Updated: May 31, 2017 05:02 IST

शारीरिक मर्यादांवर मात करून मुंबई विभागातील काही विद्यार्थ्यांनी बारावीत यश संपादन केले आहे. सातत्य आणि एकाग्रतेने

मुंबई : शारीरिक मर्यादांवर मात करून मुंबई विभागातील काही विद्यार्थ्यांनी बारावीत यश संपादन केले आहे. सातत्य आणि एकाग्रतेने अभ्यास केल्यास यश आपलेच असते, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकणाऱ्या निकिता सोनवणे या अंध विद्यार्थिनीने बारावीमध्ये ८० टक्के गुण संपादित केले. निकिताची आर्थिक परिस्थिती बेताची असून, तिची आई काबाडकष्ट करून तिला शिकवत आहे. मुंबईतील लालबाग येथील श्रीकृष्ण इमारतीमध्ये निकिता तिच्या आईसोबत भाड्याच्या घरात राहते. ती दररोज दोन ते तीन तास अभ्यास करत होती. तसेच, अभ्यासात मैत्रिणींची मदत झाल्याचे निकिता सांगते. सध्या तरी कला शाखेत पदवी घेण्याचा मानस असून, कला क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची प्रतिक्रिया निकिताने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.के.जे. सोमय्या महाविद्यालयात निधी देढिया ही कला शाखेची विद्यार्थिनी आहे. तिने बारावीत ७२ टक्के गुण मिळवले आहेत. जन्मत: निधीला अलबिनिझम हा आजार आहे. ती फक्त २५ टक्केच पाहू शकते. त्यामुळे बारावीचा अभ्यास करताना भिंगाचा वापर करायची. त्याच्या साहाय्याने तिने काही प्रमाणात स्वअध्ययन केले होते. निधीला संगीतात रस आहे. पुढे तिला संगीतात शिक्षण घ्यायचे असून, बीएडदेखील करायचे आहे. तन्मय मिरगल हा अंध विद्यार्थी आहे. त्याने बारावीच्या परीक्षेत ७७.३८ टक्के गुण प्राप्त केले आहेत. प्राध्यापकांच्या मदतीने आणि घरच्यांच्या मदतीने तन्मयने अभ्यास केला होता. राज्यशास्त्र या विषयात तन्मयला ८५, तर हिंदीमध्ये ८३ गुण मिळाले आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून त्याने अभ्यासाला सुरुवात केली होती.