मुंबई : नव्या सभापती आणि उपसभापतीची निवड करण्यासाठी २ जुलै रोजी विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.सभापती रामराजे निंबाळकर यांचे सदस्यत्व ७ जुलैला संपत असल्याने तर उपसभापती वसंत डावखरे यांचे सदस्यत्व ८ जूनला संपल्याने नव्या सभापती आणि उपसभापती निवड करण्यासाठी ८ जुलैला एक दिवसाचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित करण्यासाठी राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिपरिषदेत घेण्यात आला. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी सभापतींची निवड करणे आवश्यक होते. या अधिवेशनात नवीन सदस्यांचा शपथविधीही होणार आहे. (प्रतिनिधी)
विधान परिषदेचे ८ जुलैला विशेष अधिवेशन
By admin | Updated: June 29, 2016 05:03 IST