शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विशेष बाब म्हणून संघाची शाळा कायम अनुदानित

By admin | Updated: March 21, 2016 03:19 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीद्वारे संचालित कायम विनाअनुदानित शाळा विशेष बाब म्हणून अनुदानावर आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीद्वारे संचालित कायम विनाअनुदानित शाळा विशेष बाब म्हणून अनुदानावर आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मान्यतेने हा निर्णय घेतल्याचे सामाजिक न्याय विभागाच्या आदेशात म्हटले आहे, हे उल्लेखनीय!जनकल्याण समिती लातूर येथे सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र चालविते. गतिमंद/बहुविकलांग मुलांसाठीची ही कायम विनाअनुदानित निवासी शाळा आहे. तिला कायम अनुदानित करताना विभागाने काही अटीही घातल्या आहेत. बहुविकलांग मुलांची ही अशी राज्यातील एकमेव संस्था असल्याने विशेष बाब म्हणून या शाळेला कायम अनुदानित केले जात असल्याचे विभागाने म्हटले आहे. त्याचवेळी इतर अपंगांच्या शाळांसाठी ही विशेष बाब लागू होणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. कायम विनाअनुदानित असलेल्या अपंगांसाठीच्या शाळांसंदर्भात ‘कायम’ हा शब्द काढून त्यांना विनाअनुदानित करावे, अशी मागणी होत आहे. विनाअनुदानित अपंग शाळा दोन वर्षे चालविल्यानंतर अनुदानावर येतात, असे अपंग शाळा संहितेत (१९९७) म्हटले आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष डी.डी.सोनटक्के म्हणाले की, या शाळांना थेट कायम अनुदानित केले तर आम्ही स्वागतच करू. ‘कायम विनाअनुदानित’मधील कायम शब्द वगळावा आणि या शाळांना विनाअनुदानित तरी ठरवावे, अशी आमची मागणी आहे. लातूरच्या शाळेला थेट अनुदानित करण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, तसा शासनाला अधिकार आहे. मात्र, प्रतीक्षेत असलेल्या अनेक शाळांबाबतही विचार व्हायला हवा. (विशेष प्रतिनिधी)