शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांना विशेष सुरक्षा

By admin | Updated: August 12, 2015 02:36 IST

अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून २४ तास विशेष समूहाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षा कवचात राहणार आहेत.

नागपूर : अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून २४ तास विशेष समूहाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षा कवचात राहणार आहेत. त्यांच्यासकट संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) डझनभर अधिकाऱ्यांसह सुमारे १२५ कमांडोचा ताफा मंगळवारी संघ मुख्यालयात दाखल झाला.सरसंघचालकांसह नागपुरातील संघ मुख्यालयसुद्धा विविध अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर आहे. यापूर्वी संघ मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्नदेखील केला आहे. या हल्ल्यानंतर संघ मुख्यालय आणि सरसंघचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकावर (एसपीयू) सोपविण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणांच्या संकेतानुसार, भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.अत्याधुनिक शस्त्रे, बुलेटप्रूफ वाहनअत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले सीआयएसएफचे कमांडो कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यात निष्णात असतात. मंगळवारी दाखल झालेल्या या पथकाकडे एके ४७ / ५६, इन्सांस, एमपी -५ मशीनगनसारखी अत्याधुनिक शस्त्रे तसेच अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आहे. भागवत यांच्यासाठी लवकरच बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू कार येणार आहे.