शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष आॅनलाइन फेरी आजपासून

By admin | Updated: August 8, 2016 05:29 IST

अकरावीला दूरचे महाविद्यालय मिळाले आहे किंवा शाखा बदल करायचा आहे; अशा विविध कारणांमुळे अकरावी प्रवेशानंतरही महाविद्यालय किंवा शाखाबदल करू इच्छीणाऱ्या

मुंबई : अकरावीला दूरचे महाविद्यालय मिळाले आहे किंवा शाखा बदल करायचा आहे; अशा विविध कारणांमुळे अकरावी प्रवेशानंतरही महाविद्यालय किंवा शाखाबदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने विशेष आॅनलाइन फेरीचे आयोजन केले आहे. त्यासाठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करून आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सोमवारी, ८ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे.याआधी मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीच्या २ लाख ६९ हजार ७७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत चार गुणवत्ता यादी जाहीर झाल्या. त्यातून एकूण १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश घेतला. या यादीमध्ये नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही, अशा ७० हजार नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयाने मेसेजद्वारे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांपैकी केवळ ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला होता.या सर्व प्रक्रियेत अर्ज न भरल्याने किंवा अर्धवट अर्ज भरल्याने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात शुक्रवार आणि शनिवारी सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे उपसंचालक कार्यालयाने सांगितले. म्हणजेच आत्तापर्यंत सुमारे १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे. याउलट रिक्त जागांची संख्या एक लाखाच्या घरात गेली आहे. परिणामी, घरापासून दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या, चुकीच्या शाखेत प्रवेश घेतलेल्या, चुकीचा विषय निवडलेल्या आणि अद्याप प्रवेशापासून वंचित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना या रिक्त जागांवर प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. (प्रतिनिधी)