शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएसएमई’साठी विशेष विमा पॉलिसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 08:04 IST

आयआरडीएआयची चाचपणी सुरू : अभ्यासगटाच्या माध्यमातून ठरवणार पुढील दिशा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनावरील उपचार खर्चाची दहशत कमी करण्यासाठी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक यांसारख्या दोन विशेष आरोग्य विमा पॉलिसी बाजारात आणल्यानंतर इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडियाने (आयआरडीएआय) आर्थिक संकटात सापडलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांसाठीही विशेष विमा धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनापूर्व काळात देशात ६ कोटींपेक्षा जास्त एमएसएमई कार्यरत होत्या. त्यापैकी असंख्य उद्योगांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यास सरकारने अनुकूल धोरण स्वीकारले असले, तरी त्या उत्पादनांना बाजारात मागणीच नसल्याने या उद्योग चक्राने गती पकडलेली नाही. या स्वरूपाची संकटे किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात उद्योगांना विम्याचे संरक्षण गरजेचे ठरते. त्यामुळेच त्या आघाडीवरील चाचपणी सुरू झाली आहे. सूक्ष्म आणि लघू स्वरूपातल्या उद्योगांसाठी एक आणि मध्यम श्रेणीतल्या उद्योगांसाठी एक अशा दोन स्वतंत्र पॉलिसी तयार करण्याचा मानस आयआरडीएआयने नुकताच जाहीर केला.

सध्या फक्त पाच टक्के एमएसएमईनी विम्याचे संरक्षण घेतले असून, जास्तीतजास्त उद्योगांना विमा कवच मिळवून देण्याचा उद्देश त्यामागे आहे. अभ्यासगटाच्या माध्यमतून सूचना आणि शिफारसी प्राप्त करून या पॉलिसीची पुढील दिशा ठरवली जाईल.

कंपन्यांचे आर्थिक स्वास्थ्य धोक्यातपरदेशातील विमा क्षेत्राची व्याप्ती राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या ७% असते. भारतात हे प्रमाण जेमतेम ३.७६% आहे. आयआरडीएआय ते वाढवण्ययाच्या प्रयत्नात आहे.दरम्यान, वाढत्या क्लेममुळे विमा कंपन्यांचे आर्थिक स्वास्थ्य धोक्यात आले असून, संभाव्य आर्थिक संकट टाळण्यासाठी ‘रिस्क पूल’ उभारणीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.