मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटीनंतर मध्य, कोकण आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष भेट देण्यात येणार आहे. तब्बल १२४ विशेष ट्रेन गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार असून, मध्य आणि कोकण रेल्वेतर्फे प्रथम ९0 ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दोन ट्रेन कोल्हापूरसाठीही आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेकडून घोषित केलेल्या ९0 विशेष ट्रेन अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी १२0 विशेष ट्रेन गणेशोत्सवासाठी सोडण्यात आल्या होत्या. यंदा मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेमार्फत प्रथम ९0 विशेष ट्रेनचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एकूण १२४ ट्रेन सोडण्यात येणार असून, मध्य आणि कोकण रेल्वेच्या एकूण ९८ तर पश्चिम आणि कोकणच्या एकूण २६ अशा १२४ ट्रेन असतील. आता सोडण्यात येणाऱ्या ९0 ट्रेनमध्ये ५२ आरक्षित व ३८ अनारक्षित ट्रेनचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
गणेशभक्तांसाठी ‘विशेष’ भेट
By admin | Updated: July 15, 2014 03:19 IST