शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजन केससाठी विशेष न्यायालय

By admin | Updated: January 5, 2016 03:03 IST

कुख्यात डॉन छोटा राजनवरील खटले एकत्रित चालवण्यात यावेत, यासाठी विशेष न्यायालय स्थापण्यात यावे, अशी विनंती राज्य सरकारने काही

मुंबई : कुख्यात डॉन छोटा राजनवरील खटले एकत्रित चालवण्यात यावेत, यासाठी विशेष न्यायालय स्थापण्यात यावे, अशी विनंती राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाल केली होती. उच्च न्यायालयाने सरकारच्या विनंतीनुसार, छोटा राजनवरील सर्व खटले एकत्रित चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केली आहे.राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनवर महाराष्ट्रात तब्बल ७० केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात वरिष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणाचाही समावेश आहे. छोटा राजनवर वेगवेगळ्या ठिकाणी केसेस नोंदवण्यात आल्याने, त्याला वेगवेगळ्या न्यायालयांत खटल्यासाठी हजर करावे लागेल. मात्र, त्याच्या जीवाला धोका असल्याने, राज्य सरकारने त्याच्यावरील खटले एकाच ठिकाणी चालवण्यात यावेत, यासाठी विशेष न्यायालय नेमण्यात यावे, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती. उच्च न्यायालयाने ही विनंती मान्य करून, राजनवरील खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जे. डे हत्येप्रकरणी गेल्याच महिन्यात विशेष मोक्का न्यायालयाने छोटा राजनविरुद्ध वॉरंट बजावत तिहार कारागृह प्रशासनाला त्याला ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला.छोटा राजनला २५ आॅक्टोबर रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला भारताच्या स्वाधीन केले. राज्य सरकारने छोटा राजनवरील सर्व केसेस सीबीआयकडे वर्ग केल्या आहेत. (प्रतिनिधी)