शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला हायकोर्टात आव्हान

By admin | Updated: November 4, 2016 05:43 IST

किनान - रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींनी विशेष महिला न्यायालयाने ठोठावलेल्या आजन्म कारावासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले

मुंबई : देशभरात खळबळ उडवणाऱ्या व मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या किनान - रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींनी विशेष महिला न्यायालयाने ठोठावलेल्या आजन्म कारावासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या अपिलावरील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल अशी या आरोपींची नावे आहेत. विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी या चारही जणांना छेडछाड, कट आणि हत्या या आरोपांखाली दोषी ठरवत ५ मे रोजी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली, तसेच प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.या चौघांनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या अपिलावरील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पाच वर्षांपूर्वी, २० आॅक्टोबर २०११ मध्ये किनान (२४) आणि रुबेन (२९) अंधेरीतील आंबोली परिसरातील एका रेस्टॉरंटमधून त्यांच्या दोन मैत्रिणींसह बाहेर पडले. त्या वेळी काही रोडरोमियोंनी मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. आपल्या मैत्रिणींची छेड काढण्यात येत आहे, हे बघून किनान व रुबेन वैतागले. त्यांनी त्या तरुणांना रोखले. बाचाबाची झाल्यावर ते तरुण निघून गेले. मात्र, थोड्या वेळाने आणखी काही मित्र घेऊन परत आले. चार जणांनी किनान, रुबेनला मारहाण करून त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला. किनानचा मृत्यू त्याच रात्री झाला, तर रुबेनचा मृत्यू ३१ आॅक्टोबर रोजी झाला. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी चारही आरोपींना ताब्यात घेतले. या चारही आरोपींचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याशी संबंध असल्याचेही पुढे पोलीस तपासात उघडकीस आले. (प्रतिनिधी)