शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’विरोधात विशेष मोहीम राबवा

By admin | Updated: April 13, 2017 01:33 IST

महामार्गावरील दारूच्या दुकानांवरील निर्बंधाबाबत उलटसुलट चर्चा रंगलेली असताना सुरक्षित वाहतुकीसाठी राज्यभरात ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश

- जमीर काझी,  मुंबई

महामार्गावरील दारूच्या दुकानांवरील निर्बंधाबाबत उलटसुलट चर्चा रंगलेली असताना सुरक्षित वाहतुकीसाठी राज्यभरात ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळतानाच मद्यपी वाहनचालकांवर केसेस करण्याच्या सूचना सर्व घटकप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.१ एप्रिलपासून राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख मार्गांवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. आज अखेर रोज सरासरी हजाराहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. महिन्याअखेरीस त्याचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रस्त्यावरील अपघातांपैकी बहुतांश अपघात हे दारू पिऊन गाडी चालविण्याने होत आहेत, हे तपासणी अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याच्या अनुषंगाने न्यायालयाने सरकारच्या मालकीच्या असलेल्या महामार्गांवर ५०० मीटरच्या अंतरावर दारूच्या दुकानांना बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जात असतानाच शासन व लोकप्रतिनिधींनी या व्यवसायातून मिळणारा महसूल लक्षात घेऊन पळवाट म्हणून ‘हायवे’चा परिसर स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सुपुर्द केला जात आहे. त्याबाबत चर्चा सुरू असताना पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षकांना अपघाताच्या प्रमाणावर प्रतिबंध घालण्यासाठी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ मोहीम सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी त्याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार पोलिसांनी दैनंदिन काम सांभाळून दिवसभरात विविध टप्प्यांत ही कार्यवाही करून अहवाल मुख्यालयात पाठवायचा आहे. महत्त्वाचे सण, उत्सव किंवा स्थानिक कार्यक्रम असल्यास त्याव्यतिरिक्त अन्य दिवशीदेखील मोहीम कायम ठेवावी, अशा सूचना आहेत. या मोहिमेसाठी स्थानिक परिस्थिती, अन्य बंदोबस्ताचा विचार करूनच निर्णय घटकप्रमुखांनी घ्यायचा आहे. कारवाईमुळे तपासासह अन्य कामात खंड न पडण्याबाबत खबरदारी घ्यावी, अशी सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे. प्रतिसादानंतर पुढील निर्णयसर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’च्या कारवाईचा काहीही संबंध नाही. सुरक्षित वाहतुकीसाठी ही मोहीम राबविली जात असून, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार त्याबाबत महिन्याभरानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. - सतीश माथूर, पोलीस महासंचालक