लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘झिका’ या संसर्गजन्य आजाराचा धोका देशभरात बळावला आहे. त्यामुळे राज्य शासनही सतर्क झाले असून, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरात पाळत ठेवण्यात येत असून प्रसुतिगृहे, जिल्हा रुग्णालये याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे.तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील एका २७ वर्षीय तरुणाला ‘झिका’ची लागण झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे सतर्क होत राज्य सरकारने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखली आहे. याआधी गुजरातमध्येही ‘झिका’चे तीन रुग्ण आढळले होते.दरम्यान, ‘राज्यात अजून ‘झिका’चा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाळत ठेवण्यात आली आहे. या आजाराबाबत केंद्र सरकारने आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आम्ही पाळत आहोत. ‘झिका’ पसरविणाऱ्या डासांची अंडी नष्ट करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत, असे राज्याच्या आरोग्यसेवा विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.>‘झिका’ची लक्षणेडेंग्यु, चिकनगुनिया या आजारांसारखीच ‘झिका’ची लक्षणे आहेत. ताप, डोळे लाल होणे, डोकेदुखी आणि अंगदुखी.उपचार‘झिका’वर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. रुग्णांनी पूर्ण आराम करावा. पाणी, फळांचा रस यांचे अधिक प्रमाणात सेवन करावे.
राज्यात ‘झिका’वर विशेष पाळत!
By admin | Updated: July 12, 2017 05:17 IST