शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १५ लाखांवर बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 01:58 IST

केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहर विकास योजनेत (जेएनएनयूआरएम) पुणे महापालिकेला २ हजार ३०० कोटी रुपये मिळाले.

पुणे: केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहर विकास योजनेत (जेएनएनयूआरएम) पुणे महापालिकेला २ हजार ३०० कोटी रुपये मिळाले. त्यानंतरच्या भारतीय जनता पक्ष प्रणीत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अमृत योजनेत मात्र महापालिकेला अवघे १५ लाख रुपये मिळाले असून, त्यातून बगीचा ग्रीन स्पेसेस म्हणजे वृक्षारोपणाचा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू आहे.पालिका प्रशासनानेच ही माहिती दिली आहे. माजी उपमहापौर आबा बागूल यांनी याबाबत प्रशासनाला प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देताना प्रशासनाने भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या अमृत योजनेसाठी महापालिकेने पाणीपुरवठा, मलनि:सारण व बगीचा ग्रीन स्पेसेस या योजना दिल्या होत्या. त्यासाठी काही कोटी रूपयांची मागणी केली होती. केंद्र सरकारने पाणीपुरवठा व मलनि:सारण या योजना अमान्य केल्या. ग्रीन स्पेसेस योजनेसाठी १५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला. त्यातही केंद्र सरकारचे १० लाख व राज्य सरकारचे ५ लाख रूपये आहेत. पालिकेला हा निधी प्राप्त झाला असून, त्यातून काम सुरू असल्याचे प्रशासनाने बागूल यांना दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे. त्यापूर्वीच्या काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने जेएनएनयूआरएम या योजनेंतर्गत महापालिकेला विविध योजनांसाठी तब्बल २ हजार ३०० कोटी रूपयांचा निधी पाच वर्षांच्या कालावधीत देण्यात आला. पीएमपीएल साठी बस खरेदी, बीआरटी मार्ग, शहरांतर्गत व उपनगरातील अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अशी बरीच कामे झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी) >पैसा महापालिकाच उभा करणारआताच्या सरकारने मागील अडीच वर्षांत आतापर्यंत अमृत योजनेंतर्गत महापालिकेला फक्त १० लाख रुपये व तेही साध्या बगीचा प्रकल्पासाठी दिले आहेत, अशी टीका बागूल यांनी केली. स्मार्ट सिटीचा गवगवा केला जात आहे, मात्र त्यातही पालिकेला आतापर्यंत फक्त २०० कोटी रूपये मिळाले असून, तेसुद्धा फक्त औंध-बाणेर-बालेवाडी याच परिसरात खर्च केले जाणार आहे. स्मार्ट सिटीतील सर्व योजनांसाठी कंपनीमार्फत कर्ज काढण्यात येणार असून याचा अर्थ पालिका स्वबळावरच तेही पैसे उभे करणार आहेत, असे बागूल म्हणाले.