शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांसाठी आमदारांचा सूर फिका

By admin | Updated: January 18, 2017 03:35 IST

रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे यांना मतदार संघच शिल्लक न राहिल्याने त्यांचे पुनर्वसन कोणत्या मतदार संघात होणार

आविष्कार देसाई,

अलिबाग- रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे यांना मतदार संघच शिल्लक न राहिल्याने त्यांचे पुनर्वसन कोणत्या मतदार संघात होणार हे स्पष्ट झालेले नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत प्रयत्न करणारा मी कोण, ज्यांनी त्यांना अध्यक्षपद दिले तेच उमेदवारीबाबत ठरवतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. लाड यांच्या बोलण्यातला सूर हा टोकरे यांच्या पथ्यावर पडेल असा मुळीच जाणवला नाही.रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. विशेषत: सध्या कर्जत तालुक्यावर सर्वांच्याच नजरा वळल्या आहेत. कर्जतचे विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्यांना मतदार संघ राहिलेला नाही. त्यामुळे टोकरे नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा म्हणून ओळखले जाते. जिल्हा परिषदेचा सदस्य आणि त्यात जर त्याने अध्यक्षपद भूषविले असेल, तर त्याचे प्रमोशन आमदारकीसाठी होते, असा राजकीय इतिहास सांगतो. कर्जत तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे आमदार आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या टोकरे यांनी अध्यक्षपदाच्या कालावधीत कर्जत तालुक्यात विकासकामांच्या जोरावर चांगली बांधणी केली आहे. नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही त्यांनी कोट्यवधीची कामे केली आहेत, तर काही प्रगतिपथावर आहेत, तसेच आमदार सुरेश लाड यांनीही आमदार निधीच्या माध्यमातून विकास केला आहे. रिलायन्सच्या बेकायदा पाइप लाइन विरोधातही त्यांनी आंदोलन छेडले आहे. दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक तालुकाभर पसरवित आहेत. दोन्ही नेत्यांना अफाट राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी कशा बसणार हाही मोठा प्रश्नच आहे.कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा मतदार संघ आहेत. टोकरे यांना मतदार संघ शिल्लक राहिलेला नाही. टोकरे खांडस मतदार संघातून इच्छुक असल्याचे बोलले जाते, परंतु हा मतदार संघ शेकापच्या ताब्यात आहे. शेकाप त्यावरील हक्क सोडणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. टोकरे यांना कोणत्या मतदार संघातून उमेदवारी देणार असे त्यांना विचारले असता, ओसवाल म्हणाले, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि स्थानिक आमदार सुरेश लाड हे ठरवतील. टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत स्थानिक आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रयत्न करणार का, असे आमदार सुरेश लाड यांना विचारले, असता ज्यांनी त्यांना अध्यक्षपदी बसविले तेच ठरवतील, असे सांगितले. त्यावेळी त्यांचा सूर हा टोकरे यांच्यासाठी चांगला आहे, असे काही वाटले नाही. ज्यांचे कर्तृत्व आहे त्यांना कोणीच रोखू शकत नाही, असेही लाड बोलायला विसरले नाहीत. एकूणच टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे दिसत नाही. त्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत. त्यामुळे टोकरे यांच्यासह सर्वांना त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे.>‘कर्तृत्ववान व्यक्तीला कोणीच रोखू शकत नाही’टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत स्थानिक आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रयत्न करणार का, असे आमदार सुरेश लाड यांना विचारले, असता ज्यांनी त्यांना अध्यक्षपदी बसविले तेच ठरवतील, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यावेळी त्यांचा सूर हा टोकरे यांच्यासाठी चांगला आहे, असे काही वाटले नाही. ज्यांचे कर्तृत्व आहे त्यांना कोणीच रोखू शकत नाही, असेही सुरेश लाड यावेळी बोलायला विसरले नाहीत. एकूणच टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे दिसत नाही. त्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत. त्यामुळे टोकरे यांच्यासह सर्वांना त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे.