शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमधील विमानतळासाठी २० आॅक्टोबरपासून जागेचा सर्व्हे

By admin | Updated: October 19, 2016 00:58 IST

पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येत्या २० आॅक्टोबर पासून जागेचा सूक्ष्म सर्व्हे करण्यास सुरुवात करण्यात येणार

पुणे : पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येत्या २० आॅक्टोबर पासून जागेचा सूक्ष्म सर्व्हे करण्यास सुरुवात करण्यात येणार असून, ७ नोव्हेंबरला हा सर्व्हे पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, विमानतळासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यापूर्वी लोकांचा असंतोष कमी करण्यासाठी पॅकेजची तीन मॉडेल तयार करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त उत्तम मॉडेलचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.राव म्हणाले, ‘‘पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. लोकांचा विरोध कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने थेट संवाद साधण्यात येणार आहे. तसेच लोकांच्या संमतीशिवाय जमीन संपादित करण्यात येणार नाही. दरम्यान, विमानतळाचा सूक्ष्म सर्व्हे झाल्यानंतर कोणत्या जमिनी संपादित करण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या वतीने स्वतंत्र नोटिफिकेश्न प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांना अमरावती (आंध्र प्रदेश), नवी मुंबई आणि कोची तीन मॉडेलचा अभ्यास करून पुरंदरसाठी स्वंतत्र मॉडेल तयार करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक मॉडेल तयार करून पॅकेज घेताना पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये वन टाईम पुनर्वसन करण्यापेक्षा विकासामध्ये बाधित शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)>संपूर्ण पुरंदर तालुक्याचे महसूल रेकॉर्ड अद्ययावत करणारमहसूल विभागाच्या वतीने संपूर्ण पुरंदर तालुक्याचे महसूल रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे एका सातबाऱ्यावर नक्की किती खातेदार आहेत, वारसदार, प्रत्यक्ष जमीन कोण कसतंय आदी सर्व माहिती अद्ययावत होईल. जमिनीचा मोबदला देताना होणारे वाद यामुळे कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.विमानतळाच्या जागेबाबत संभ्रमचपुरंदर तालुक्यातील नक्की कोणत्या गावांमध्ये हे विमानतळ होणार, हे अद्यापही प्रशासनाने अथवा शासनाने स्पष्ट केलेले नाही. यामुळे येथील नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विचारले असता त्यांनीदेखील गावांची नावे सांगण्यास टाळाटाळ केली.