शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सपाचा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा

By admin | Updated: December 20, 2015 00:55 IST

विधान परिषदेच्या मुंबईतील निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने, कॉँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबईतील निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने, कॉँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबई महापालिकेत सपाचे ९ नगरसेवक असल्याने, जगताप यांना विजयासाठी ही मते महत्त्वाची ठरणार आहेत. धर्मनिरपेक्षततेच्या मुद्द्यावर जगताप यांचे समर्थन करण्याचा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत झाल्याचे, सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सांगितले. विधान परिषदेसाठी येत्या २७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. त्यामध्ये शिवसेनेतर्फे मंत्री रामदास कदम, तर कॉँग्रेसने भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्या शिवाय राष्ट्रवादीतून बंडखोरी करून प्रसाद लाड रिंगणात उभे राहिले आहेत. मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर सपाने शनिवारी पाठिंबा जाहीर केल्याने, जगताप यांना ही बाब फायद्याची ठरणार आहे. देशातील वाढती असहिष्णुता व जातीयवाद लक्षात घेता, धर्मनिरपेक्ष उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळे जगताप यांना मतदान करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला, असे अबू आझमी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)