शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबिनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी केला चक्काजाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 18:45 IST

सोयाबिनला अपेक्षित दर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी व्यापारी व शासनाच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारला.

ऑनलाइन लोकमतकारंजा लाड, दि. 7 - सोयाबिनला अपेक्षित दर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी व्यापारी व शासनाच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारला. यादरम्यान रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने या प्रश्नावर तोडगा निघाला.गत तीन वर्षांपासून शेतकरी सततच्या दुष्काळाने अक्षरश: होरपळत असताना यावर्षी प्रारंभी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, परतीच्या पावसाने थैमान घालून सोयाबिनचे जबर नुकसान झाले. एकीकडे अशी विदारक परिस्थिती उद्भवली असताना दुसरीकडे शेतमालाचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्याचाच परिणाम सोयाबीनच्या बाजार भावावर झाला असून हमी भावापेक्षाही कमी भावाने सोयाबिन खरेदी केले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्काजाम करून आपला संताप व्यक्त केला.