अकोला : राज्यातील बहुतांश भागात मागील पाच दिवसांपासून बर्यापैकी पाऊस पडत असल्याने खरीप पेरण्यांना वेग आला असून, मागील आठवड्यात नऊ टक्क्यांवर स्थिरावलेले पेरणीचे क्षेत्र ३0 जूनपर्यंंत ३४ टक्क्यांवर म्हणजेच १३९. ३४ हेक्टरपैकी ५0 लाख ५६ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. राज्यातील खरीप पिकांचे क्षेत्र १३९.६४ हेक्टर असून, मागील २४ जूनपर्यंंत यापैकी १३.२२ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच नऊ टक्के पेरणी झाली होती. ३0 जूनपर्यंत यामध्ये भर पडली. विदर्भ व कोकणात भात पिकाच्या पुनर्लागवडीसाठी पूर्व मशागतीची कामे काही ठिकाणी आटोपली असून, काही ठिकाणी सुरू आहेत. नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे.राज्यात यावर्षीही पावसाला उशिरा सुरुवात झाली असून, अनेक भागातील शेतकर्यांना आजही पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे; परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यातील सहा विभागात काही ठिकाणी बर्यापैकी पाऊस पडत असल्याने शेतकर्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. अमरावती विभागातील पाच जिल्हय़ाचा पेरणीचा कार्यालयीन आकडा हा ४७ टक्के असला तरी प्रत्यक्षात ६0 टक्केपर्यंत पेरणी पोहोचली असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. नागपूर विभागातील पेरणीचा आकडा मात्र १५ ते २0 टक्क्यांवरच स्थिरावला आहे. अमरावती विभागात ३२ लाख हेक्टर खरीप हंगामाचे क्षेत्र आहे. शेतकर्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिली असून, कापूस विदर्भाचे नगदी पीक दुसर्या क्रमाकांवर आहे.- नागपूर विभागात भाताच्या रोपवाटिका नागपूर विभागात धान हे प्रमुख पीक असून, शेतकरी धाणाच्या रोप वाटिका तयार करीत आहेत; परंतु त्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
राज्यात ३४ टक्के क्षेत्रावर पेरणी !
By admin | Updated: July 1, 2016 00:22 IST