शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्या संकटात

By admin | Updated: July 10, 2017 04:37 IST

मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यातील पेरण्या संकटात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यातील पेरण्या संकटात आल्या आहेत. मराठवाड्यात साधारण ४३ लाख हेक्टर खरीप पीक पेरणी क्षेत्र आहे. त्यातील सुमारे २५ टक्क्यांदरम्यान पेरणी झालेली आहे. विभागाची पावसाची सरासरी ७७९ मि.मी. इतकी असून आतापर्यंत १९० मि.मी.च्या आसपास म्हणजे केवळ २३ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीला दमदार सुरुवात करून नंतर वरुणराजाने हात आखडता घेतला. मृगातही बऱ्यापैकी सरी कोसळल्याने फुलंब्री, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यात पिके बहरली. परंतु आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, सोयगाव, कन्नड, सिल्लोड, पैठण तालुक्यात पीक परिस्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ७७ टक्के पेरणी झाली; मात्र पिके ऐन वाढीच्या काळात असतानाच १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके माना टाकू लागली आहेत. शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देऊन पिके जगविण्यासाठी धडपडत आहेत. पाच-सहा दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. लातूर जिल्ह्यात ८५ टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या. जिल्ह्यात खरिपाचे ६ लाख हेक्टर क्षेत्र असून, ५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरा झाला आहे़ त्यामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक ३ लाख हेक्टर पेरा आहे़ नांदेड जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या. काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके अडचणीत आहेत. जिल्ह्यातील ७ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी ७ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्र खरीपयोग्य शेतजमीन आहे. जिल्ह्यातील ३० मंडळात अत्यल्प पाऊस झाला.जालना जिल्ह्यात पावसाचा तब्बल २० दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. खरीप ज्वारीची सरासरीच्या १.९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापूस पिकाची उगवण चांगली झाली आहे. आता पावसाअभावी वाढ खुंटली आहे. परभणी जिल्ह्यात ३ लाख ३० हजार ६३७ हेक्टर (६३ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून पाऊस लांबल्याने ही सर्व पिके धोक्यात आहेत. हिंगोली जिल्ह्यात ८१ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत, मात्र पाऊस नाही. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ९७ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु, २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. >२० हेक्टर क्षेत्रावर फिरविला रोटाव्हेटरपावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी २० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरविले. पाऊस नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सुनील कोळी, लोटन पाटील, तुषार पाटील, साहेबराव बडगुजर या शेतकऱ्यांनी सांगितले.दुबार पेरणीनंतरही पाऊस न आल्याने आत्महत्याजळगाव : दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने पीक वाया जाण्याच्या भीतीने नितीन विठ्ठल काटे (३०, रा. सुनसगाव, ता. भुसावळ ) यांनी विषप्राशन करून रविवारी आत्महत्या केली.