शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दक्षिण आशिया होरपळतोय!

By admin | Updated: July 5, 2015 02:40 IST

दक्षिण नैर्ऋत्य मान्सून भारतासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा. पण त्याचं रूप वर्षानुवर्षे वेगवेगळं असतं. कधी मान्सून जास्त बरसतो तर कधी कमी.

- शुभांगी भुते

(लेखिका मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक आहेत.)

दक्षिण नैर्ऋत्य मान्सून भारतासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा. पण त्याचं रूप वर्षानुवर्षे वेगवेगळं असतं. कधी मान्सून जास्त बरसतो तर कधी कमी. मान्सूनच्या बदलत्या रूपाला बरेच घटक कारणीभूत ठरतात. जसे की, अलनिनो, युरोपिय देशातील वातावरणातील उष्णता, समुद्राचे तापमान आणि पूर्व आशियायी देशांतील हवेचा दाब. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम विचारात घेऊन भारतीय हवामान शास्त्र विभाग दरवर्षी पावसाची दीर्घकालीन पूर्वअनुमान देते. साधारणत: पावसाळ्याचे आगमन केरळपासून होते. टप्प्याटप्प्याने तो संपूर्ण देश व्यापतो. या साऱ्या काळात वातावरणात कमी-जास्त प्रमाणात फरक पडत असतात. यंदा भारतात पावसाळ्याचे आगमन ५ जूनला झाले. २६ जूनपर्यंत त्याने संपूर्ण देश व्यापला. पण याच काळात आपल्या शेजारील देशात म्हणजेच पाकिस्तानात उष्णतेची लाट आली; आणि त्यात हजारो लोकांचे प्राण गेले. पावसाळ्याच्या सुरुवातीला एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असतो. या पट्ट्याची व्याप्ती राजस्थानपासून पाकिस्तानपर्यंत असते. यालाच उष्णता (हिट) असेही म्हणतात. याचवेळी संबंधित ठिकाणापासून बंगालच्या उपसागरापर्यंत द्रोणीय भाग तयार होऊन कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतो. यालाच ‘हिट लो’ असेही म्हणतात. जेव्हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतो तेव्हा वाऱ्यांची दिशा पश्चिम/दक्षिण अशी असते. हेच वारे समुद्राहून अधिक तीव्रतेने वाहतात. याचाच परिणाम म्हणून या वर्षी पाकिस्तानात उष्णतेची लाट येऊन गेली आहे. याच काळात जमिनीवर अगदी कमी प्रमाणात वारे वाहतात आणि हे सर्व वारे उष्ण-अतिउष्ण असतात. सोबतच या दिवसांत आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढते. सामान्य लोकांना ४३ डिग्री अंश सेल्सिअस असलेले तापमान पण ४७ डिग्रीपर्यंत आहे असे जाणवते. आता उद्भवलेली परिस्थिती खूप दिवस सुरू होती आणि हा एक संशोधनाचाच विषय आहे. तसेच आयपीसीसीच्या रिपोर्टमध्येसुद्धा हे नमूद केले आहे की, आताची उष्णतेची लाट ही जागतिक तापमानवाढीमुळे आली आहे. हे प्रमाण दक्षिण आशियायी देशांमध्ये अधिक आहे. हा एका एक्स्ट्रिम वेदरचा भाग असून, अनेक देश संशोधन करीत आहेत.अलनिनो, युरोपिय देशातील वातावरणातील उष्णता, समुद्राचे तापमान आणि पूर्व आशियायी देशांतील हवेचा दाब; असे अनेक घटक भारतीय मान्सूनवर प्रभाव पाडत असतात. समुद्राचे वाढते तापमान आणि हवेचा दाब या घटकांमुळे उष्णतेची लाट पसरते. जागतिक तापमानवाढही यात भर घालते. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मान्सून हेलकावे खातो, उष्णतेच्या लाटेची व्याप्तीही वाढते. हे बदल मात्र आपल्याला सोसत नाहीत.