शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच डाक घर आपके द्वार!

By admin | Updated: July 5, 2016 01:14 IST

डाक सेवक देणार नागरिकांना घरपोच सेवा.

राम देशपांडे / अकोलाआधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या भारतीय डाक विभागाच्यावतीने लवकरच डाक घर आपके द्वार ही योजना सुरू होणार आहे. यात डाक सेवकांच्या (पोस्टमन) माध्यमातून नागरिकांना घरबसल्या डाक तिकीट, पोस्टकार्ड आणि लिफाफे विकत घेता येतील. तसेच स्पीड पोस्ट व साधारण पत्र पाठवता येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डाक सेवकांना विशेष उपकरण दिले जाणार असल्याची माहिती अकोला प्रवर डाक अधीक्षक एन. पी. आरसे यांनी दिली.भारतीय डाक विभागाने काळानुरूप आपला चेहरा मोहरा बदलून आत्याधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सध्याच्या घटकेला बँकिंग क्षेत्रात भरारी घेण्याचे ध्येय बाळगून असलेला भारतीय डाक विभाग लवकरच डाक घर आपके द्वार या योजनेद्वारे डाक घरात दिल्या जाणार्‍या बहुतांश सुविधा नागरिकांना घरपोच देणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी सर्व डाक सेवकांची मदत घेतली जाणार आहे. त्याकरिता प्रत्येक डाक सेवकास एक विशेष उपकरण देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना घरबसल्या डाक सेवकांकडून डाक तिकिटे, पोस्ट कार्ड, लिफाफे आदी खरेदी करता येतील. तसेच डाक सेवकांजवळील उपकरणाच्या साहाय्याने नागरिकांना स्पीड पोस्ट आणि साधारण पोस्ट अशा विविध सेवांचा लाभ नागरिकांना घरबसल्या किंवा ऑफिसमध्येच घेता येणार आहे. या योजनेची प्रथामिक चाचणी मुंबईतील भांडुप ईस्ट आणि छिंदवाडा येथे घेण्यात आली असून, तिच्या यशस्वीतेनंतरच भारतीय डाक विभागाने ही योजना संपूर्ण भारतात टप्प्या टप्प्याने राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरसे यांनी स्पष्ट केले. डाक विभागाची स्थिती उत्तमगत काळात डाक विभागाची जी ओळख होती त्यात यत्किंचितही बदल झालेला नसल्याची माहिती मुख्य डाक घरातील अधिकार्‍यांनी दिली. मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता डाक विभागामार्फत दिल्या जाणार्‍या सुविधांची मागणी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अकोला विभागात महिन्याकाठी ५0 हजार पोस्टकार्डांची, ४0 हजार लिफाफ्यांची, तर १ रुपयासून ते २0 रुपयांपर्यंतच्या सुमारे १0 लाख रुपयांच्या डाक तिकिटांची महिन्याकाठी विक्री होत असून गत काळात भारतीय डाक विभागाने सुरू केलेली माय स्टँम्प योजना लवकरच शाळा-महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे या विभागातर्फे सांगण्यात आले.