शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक विजेच्या दराबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

By admin | Updated: January 23, 2016 03:59 IST

राज्यातील उद्योजकांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासन औद्योगिक विजेचे दर कमी करण्याच्या दृष्टीने लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती

मुंबई : राज्यातील उद्योजकांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासन औद्योगिक विजेचे दर कमी करण्याच्या दृष्टीने लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील उद्योग टिकून राहून तो वृद्धिंगत व्हावा यादृष्टीने शेजारील राज्यांप्रमाणे उद्योगांना विजेच्या दरात सवलत देण्यात यावी, या उद्योजकांच्या मागणीबाबत उद्योजकांच्या अडचणी लक्षात घेऊन ऊर्जा विभाग शेजारील राज्याप्रमाणे विजेचे दर समपातळीवर आणण्यासाठी तोडगा काढण्यात येईल. मराठवाडा, विदर्भातील औद्योगिक विजेचे दर कमी करण्याच्या दृष्टीने माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे देसाई यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)‘मेक इन इंडिया’ सप्ताह फेब्रुवारीला महाराष्ट्रात होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. या सप्ताहामध्ये महाराष्ट्राच्या उद्योगाच्या प्रगतीचे प्रदर्शन, लघू उद्योगाचा विकास, लघू उद्योजकांना मार्गदर्शन करणारे वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्र, उद्योजकांच्या यशोगाथा आदी कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.किरकोळ व्यापार धोरणाचा मसुदाकिरकोळ व्यापारामध्ये व्यवसायाच्या चांगल्या संधी असून, त्या वृद्धिंगत होण्यासाठी किरकोळ व्यापार धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच मांडण्यात येणार आहे. फळे, भाजीपाला, दूध यांसारख्या नाशवंत मालाचा समावेश अत्यावश्यक सेवामध्ये करून त्या महाराष्ट्र जीवनाश्यक कायद्यांतर्गत आणण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.