शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेडिओलॉजिस्ट अभावी सरकारी रुग्णालयांमधील सोनोग्राफी बंद

By admin | Updated: March 4, 2015 01:50 IST

ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील सरकारी रुग्णालयांना मिळालेल्या निधीतून खरेदी केलेली सोनोग्राफी मशिन्स रेडिओलॉजिस्ट अभावी धूळखात पडली आहेत.

पुणे : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील सरकारी रुग्णालयांना मिळालेल्या निधीतून खरेदी केलेली सोनोग्राफी मशिन्स रेडिओलॉजिस्ट अभावी धूळखात पडली आहेत. त्यामुळे गरोदर माता आणि बालमृत्यू रोखण्याच्या उपायांमध्ये अडचणी येत आहेत.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या (एनआरएचएम) अंमलबजावणीला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कामाचा आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी आरोग्य यात्रेअंतर्गत पाहणी सुरू आहे. त्यासाठी १३ जिल्ह्यांतील काही तालुके निवडण्यात आले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा, पुरंदर, रायगडमधील कर्जत या तालुक्यांमधील सरकारी रुग्णालयांची पाहणी करण्यात आली. गरोदर महिलांची सोनोग्राफी करणे आवश्यक असते. त्यामुळे गरोदर माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखले जाऊ शकते. आरोग्ययात्रेदरम्यान झालेल्या जनसुनवाईमध्ये सोनोग्राफी बंद असल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. खासगी रुग्णालयांमधून सोनोग्राफीसाठी सीएसआर अंतर्गत खर्च देण्यात येईल. तसेच रेडिओलॉजिस्टला योग्य मोबदला देऊन ते उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. आरोग्य सेविकांच्या गावभेटी होत नाहीत, डॉक्टर रात्री थांबत नाहीत, अंगणवाडी सुरू झालेली नाही, असेही प्रश्न आदिवासींनी मांडले. साथी संस्थेचे शैलेश डिकळे, तृप्ती जोशी, बी.जे. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर निलोफर बिजली, दिनकर पाटील आदी या पाहणी पथकात होते. (प्रतिनिधी)च्रेडिओलॉजिस्ट मिळत नसल्याने रुग्णांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी लागत आहे. आदिवासी व गरीब महिलांना सोनोग्राफीवर खर्च करणे शक्य नसल्याने माता व बाळाच्या जिवावर बेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आरोग्ययात्रेदरम्यान झालेल्या जनसुनवाईमध्ये सोनोग्राफी बंद असल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला.