शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात आजपासून सोनोग्राफी बंद

By admin | Updated: June 20, 2016 01:22 IST

मागील ६ दिवसांपासून पुण्यात बेमुदत बंद असलेली सोनोग्राफी सोमवारपासून (दि. २०) राज्यभरात बंद होणार आहे. त्यामुळे सोनोग्राफी आणि एक्स-रेच्या आंदोलनाला व्यापक स्वरुप

पुणे : मागील ६ दिवसांपासून पुण्यात बेमुदत बंद असलेली सोनोग्राफी सोमवारपासून (दि. २०) राज्यभरात बंद होणार आहे. त्यामुळे सोनोग्राफी आणि एक्स-रेच्या आंदोलनाला व्यापक स्वरुप प्राप्त होण्याची शक्यता आहे़ गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यातील अन्यायकारक तरतुदींच्या आधारावर पुण्यातील रेडिओलॉजिस्टवर केलेल्या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असून आता तो संपूर्ण राज्यात चालू होणार आहे. राज्यभरातील रेडिओलॉजिस्ट संपावर विविध मागण्यांसाठी १४ जून रोजी गेले होते. त्यानंतर पुण्यातील रेडिओलॉजिस्टनी बेमुदत संप केला होता. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांना शासकीय स्तरावरुन कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याने सोमवारपासून हा संप राज्यस्तरीय होत असल्याचे इंडियन रेडिओलॉजिस्ट अँड इमेजिंग असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. याबाबत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ. जिग्नेश ठक्कर म्हणाले, केवळ कारकुनी त्रुटींच्या आधारावर रेडिओलॉजिस्टवर अन्यायकारक कारवाई करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदलीची आणि पीसीपीएनडीटी कायद्यात तातडीने सुधारणा व्हाव्यात, यासाठी हा संप पुकारण्यात येत आहे. पुण्यातील बेमुदत आंदोलनाला शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने या आंदोलनाला राज्यस्तरीय स्वरुप आले असून हा बंदही बेमुदत चालू राहणार आहे. (प्रतिनिधी)