शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया-राहुल दीक्षाभूमीवर

By admin | Updated: April 12, 2016 05:43 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गाधी यांनी सोमवारी दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा आणि डॉ. बाबासाहेब

नागपूर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गाधी यांनी सोमवारी दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यांनी काही वेळ ध्यानसाधनाही केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे आणि सुधीर फुलझेले यांनी राहुल व सोनिया गांधी यांचे स्वागत करीत त्यांना मध्यवर्ती स्मारकात नेले. सोनियाजी व राहुल यांनी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला व डॉ. आंबेडकरांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पणकरीत अभिवादन केले. त्यानंतर दोघांनीही खाली बसून १० मिनिटे ध्यानसाधनाकेली. त्यांनी बोधिवृक्षाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. (प्रतिनिधी)दीक्षाभूमीचे स्मृतिचिन्ह भेट डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि सचिव सदानंद फुलझेले यांनी चांदीची प्रतिकृृती असलेले दीक्षाभूमीचे स्मृतिचिन्ह आणि डॉ. आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट स्वरूपात सोनियाजी व राहुल गांधी यांना दिला.२२ प्रतिज्ञांचे वाचनडॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेताना अनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा शिलालेख येथे उभारण्यात आलेला आहे. बोधिवृक्षाजवळ सोनिया गांधी या ‘व्हिजिट बुक’मध्ये संदेश लिहीत असताना राहुलयांनी शिलालेखावरील प्रतिज्ञेचे वाचन केले. ‘हा मैं इन्हे पहेचानती हूँ’दीक्षाभूमीवरील भेटीदरम्यान ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सोनिया गांधी यांना स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांची भेट घालून देताना त्यांचा परिचय देऊ लागले. तेव्हा सोनिया गांधी यांनी ‘हा मैं इन्हे पहेचानती हूँ’ असे सांगितले. मी यापूर्वीसुद्धा दीक्षाभूमीवर येऊन गेली आहे. तेव्हा सदानंद फुलझेले यांच्याशी भेट झाली होती, असेही त्यांनी शिंदे यांना सांगितले.व्हिजिट बुकमध्ये लिहिलेला संदेशदीक्षाभूमीवर येणे, ही माझ्यासाठी फार मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. मी दीक्षाभूमीला माझी सद्भावना अर्पण करते. - सोनिया गांधी