शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

सोनिया गांधी यांची आज कोल्हापुरात सभा

By admin | Updated: October 9, 2014 00:52 IST

मेरी वेदर मैदानावर जय्यत तयारी : अनेक मान्यवर नेते हजर राहणार, कडक पोलीस बंदोबस्त

कोल्हापूर : काल, मंगळवारी झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे गांधी मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सभा उद्या, गुरुवारी कसबा बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानावर सकाळी अकरा वाजता होणार आहे. काल रात्री उशिरा सभेचे मैदान बदलण्याचा निर्णय झाला असून, मेरी वेदर मैदानावर आज, बुधवारी दिवसभर सभेची तयारी सुरू होती. दिल्ली येथील विशेष सुरक्षा दल (एसपीजी) आणि कोल्हापूर पोलिसांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गांधी मैदानाची पाहणी केली आणि सभा घेण्यासारखी परिस्थिती नसल्याचे मत त्यांनी नोंदविले. त्यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रभारी अध्यक्ष प्रकाश सातपुते यांच्याशी पोलिसांनी चर्चा केली. चर्चेनंतर गांधी मैदानाऐवजी मेरी वेदर मैदानावर सभा घेण्याबाबत चर्चा झाली. स्थानिक अधिकाऱ्यांच्या तसेच कोल्हापुरात आलेल्या एस.पी.जी.च्या / अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर दिल्ली येथील कार्यालयाकडून रात्री उशिरा सोनिया गांधी यांच्या सभेचे ठिकाण बदलण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासून मेरी वेदर मैदानावर तयारी सुरू झाली. व्यासपीठ व लक्कडकोट उभारण्यास सुरुवात झाली. सोनिया गांधी कोणत्या रस्त्यावर येणार व सभा संपल्यानंतर कशा परत जाणार, याचे नियोजन तातडीने सुरू झाले. सभेच्या तयारीसाठी फारच कमी वेळ मिळणार असल्याने गांधी मैदानावरचे काम ज्या ठेकेदाराला दिले होते, त्याच्याऐवजी दुसऱ्याच ठेकेदाराला काम देण्यात आले. आज दिवसभर मैदानावर सुरक्षारक्षकांचा पहारा होता. मैदानाची तसेच परिसराची पाहणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह अनेक अधिकारी सभेच्या ठिकाणची पाहणी करीत होते. अनेक मान्यवर नेते येणार सोनिया गांधी यांच्या सभेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, चिटणीस स्वराज वाल्मीकी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, आदी नेतेही कोल्हापुरात येत आहेत. सभा अकरा वाजता सुरू होणार असून सोनिया गांधी बारा वाजता सभेच्या ठिकाणी येतील.