शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सोनार यांच्या पुस्तकाला जयवंत दळवी पुरस्कार

By admin | Updated: September 20, 2016 03:06 IST

जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी यंदा प्रा. अनिल सोनार यांच्या ‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक’ या विनोदी लेखसंग्रहाची पुरस्कार समितीने निवड केली

मुंबई : मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे देण्यात येणाऱ्या जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी यंदा प्रा. अनिल सोनार यांच्या ‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक’ या विनोदी लेखसंग्रहाची पुरस्कार समितीने निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार १११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आहे. यावर्षी ‘विनोद’ या वाङ्मय प्रकारासाठी पुरस्कार ठेवण्यात आला होता.ज्येष्ठ लेखक मुकुंद टाकसाळे यांच्या हस्ते ८ आॅक्टोबर रोजी पुण्यात या पुरस्काराचे वितरण होईल. जयवंत दळवी स्मृती पुरस्काराचे यंदा २० वे वर्ष आहे. ‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक’ हा विनोदी लेखसंग्रह मनोरमा प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केला आहे.प्रा. दीपक घारे, नीलिमा भावे आणि प्रा.जयप्रकाश लब्धे यांच्या निवडसमितीने अनिल सोनार यांच्या या विनोदी लेखसंग्रहाची जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी एकमताने निवड केली.प्रा. अनिल सोनार यांनी या विनोदी लेखांमधून भोवतालच्या समाजात घडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर आणि मानसिकतेवर खुमासदार शैलीत भाष्य केले आहे. फाडफाड इंग्रजी, चायनीज फूड, बुवाबाजी, वास्तुशास्त्र, चित्रपटगीते, साहित्य, भविष्याचे वेड अशा अनेक विषयांवर लिहिताना अनिल सोनार रोजच्या जीवनातील विसंगती टिपतात आणि शाब्दिक कोट्या, उपहास, विडंबन अशा विविध प्रकारांतून विनोदाची निर्मिती करतात. जीवनसंघर्षाकडे सकारात्मक उमदेपणाने पाहण्याची मराठी विनोदी लेखनाची परंपरा अनिल सोनार यांच्या लेखनात टिकून असल्याने निवडसमिती या संग्रहाची शिफारस करीत आहे, असे मत समितीने या पुस्तकाची निवड करताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)