शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली कुलकर्णी ‘सखी मंच’ची ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’

By admin | Updated: January 10, 2016 01:04 IST

विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमतने ‘सखी मंच’ हा उपक्रम सुरू केला. महिलांचे केवळ मनोरंजनच नाही, तर त्यांना यामधून काही तरी

पुणे : विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमतने ‘सखी मंच’ हा उपक्रम सुरू केला. महिलांचे केवळ मनोरंजनच नाही, तर त्यांना यामधून काही तरी शिकता यावे, त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये केले जाते. यंदाच्या वर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या लोकमत सखी मंचची २०१६-२०१७ वर्षांसाठी अ‍ॅम्बॅसिडर असणार आहेत. सोनाली कुलकर्णी एक नृत्यांगना असून तिने अभिनय क्षेत्रातही तिचा ठसा उमटवला आहे. आजवर सोनालीने गाढवाचं लग्नं, बकुळा नामदेव घोटाळे, आबा जिंदाबाद, हाय काय नाय काय, नटरंग, क्षणभर विश्रांती, अजिंठा, झपाटलेला २, रमामाधव, मितवा, क्लासमेट्स, टाईमपास २, शटर या चित्रपटांत अभिनय केला आहे, तर नटरंगमधील ‘अप्सरा’ गाण्यातील सोनालीच्या नृत्याने आणि अभिनयाने तमाम प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. याबरोबरच हिंदीतील सिंघम रिटर्न्स आणि ग्रँड मस्ती या चित्रपटांमधूनही तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. (प्रतिनिधी)आनंददायी प्रवास...लोकमत सखी मंचची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर सोनाली सांगते, ‘लोकमत सखी मंचची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर झाल्याचा मला विशेष आनंंद आहे. कारण यापूर्वी मला लोकमत युवा नेक्स्टच्या माध्यमातून तमाम तरुणाईशी संवाद साधता आला होता. आता सखी मंचमुळे मला विविध क्षेत्रांतील महिलांशी संवाद साधता येईल. युवा नेक्स्ट ते सखी मंच हा माझा प्रवास खूप आनंददायी आहे. यामुळे मला विविध शहरांतील आणि क्षेत्रांतील महिलांना भेटून त्यांचे अनुभव जाणून घेण्याची संधी मला मिळाली आहे.’