शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या रिकाम्या टाकीत पडलेला मुलगा सुखरूप सापडला

By admin | Updated: March 11, 2016 01:57 IST

महापालिका शाळेतील शिपायाच्या हलगर्जीपणामुळे एका लहान विद्यार्थ्याचे प्राण संकटात सापडले. पाण्याच्या रिकाम्या टाकीत तब्बल ४ दिवस थेट मृत्यूबरोबरच त्याला लढा द्यावा लागला.

पुणे : महापालिका शाळेतील शिपायाच्या हलगर्जीपणामुळे एका लहान विद्यार्थ्याचे प्राण संकटात सापडले. पाण्याच्या रिकाम्या टाकीत तब्बल ४ दिवस थेट मृत्यूबरोबरच त्याला लढा द्यावा लागला. गुरुवारी सकाळी तो टाकीत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला तिथून काढून लगेचच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या मुलाचे प्राण वाचले असून, आता त्याची प्रकृती व्यवस्थित आहे.कासेवाडी येथील महापालिकेच्या संत हरकादास प्राथमिक शाळेत (शाळा क्र. २९) शिवरात्रीच्या दिवशी (सोमवारी) हा प्रकार घडला. फय्याज इम्तियाझ मुलतानी (वय ९, रा. कासेवाडी) असे या मुलाचे नाव आहे. याच शाळेत प्राथमिक वर्गात तो शिकतो. सोमवारी शाळेला सुटी होती. शाळेच्या इमारतीच्या वर पाण्याची रिकामी टाकी आहे. मुले तिथे जात असतात. फय्याज सोमवारी संध्याकाळी तिथे गेला असताना टाकीत पडला. पडताना लागल्यामुळे त्याला वर येता आले नाही. दरम्यान, अंधार पडला. त्याच्या घरचे काळजी करू लागले. स्थानिक कार्यकर्ते भारत कांबळे यांच्यासह खडक पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार त्याच्या पालकांनी नोंदवली.सोमवारी रात्री, मंगळवारी, बुधवारी दिवसा व रात्रीही फय्याज टाकीतून अधूनमधून मदतीसाठी ओरडत होता. शाळेतील गोंधळामुळे दिवसा त्याचा आवाज कोणाला ऐकू येत नव्हता. आज (गुरुवारी) सकाळी काही मुलांनी तो टाकीकडे गेला असावा, अशी शंका व्यक्त केली. यावरून तिथे शोध घेण्यात आला, त्या वेळी तो टाकीतच पडला असल्याचे आढळले. त्याची अवस्था खराब झाली होती; त्यामुळे त्याला लगेचच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकांनी शाळेतील शिक्षकांकडे चौकशी केली असता त्यांनी टाकीचा वापर होत नसल्याचे सांगितले. रात्री काही आवाज ऐकू येत होते; मात्र भुताचा आवाज असावा म्हणून दुर्लक्ष केले असल्याची माहिती शिपायाने दिली.कासेवाडी भागाचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज अंदाजपत्रकीय सभेचे कामकाज थांबवून हा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी दिलेल्या माहितीने सभागृह अवाक् झाले. महापौर प्रशांत जगताप यांनी संबंधित शाळेतील शिपायाला त्वरित निलंबित करावे, असे आयुक्त कुणाल कुमार यांना सुचविले. शिक्षकांचीही चौकशी करावी, अशी मागणी बागवे तसेच सभागृह नेते बंडू केमसे यांनी केली. नगरसेवक सोनल झेंडे, योगेश मुळीक यांनी त्यांच्या भागातही असे प्रकार घडले असल्याचे सांगितले. महापौर जगताप यांनी त्यावर आपल्या दालनात स्वतंत्र चर्चा करू, असे सांगितले.