शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

कहीं खुशी कहीं गम!

By admin | Updated: November 19, 2016 03:52 IST

पाचशे आणि हजारांच्या नोटांवर घातलेल्या निर्बंधामुळे नागरिकांची परवड होत आहे.

डोंबिवली : पाचशे आणि हजारांच्या नोटांवर घातलेल्या निर्बंधामुळे नागरिकांची परवड होत आहे. त्यात आता बँकांमधून केवळ दोन हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले आहे. यामुळे सगळ्यांनाच पैसे मिळतील, अशी भावनाही ते व्यक्त करत आहेत. कालबाह्य झालेल्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याची मुदत असतानाही आजही काही ठिकाणी त्या सर्रासपणे नाकारल्या जात असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. नोटाबंदीचा सर्वात जास्त फटका भाजीविक्रेत्यांना बसला आहे. घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. भाजीपाला विक्रीविना तसाच पडून राहत असल्याने सडत आहे. ग्राहकांनीही पाठ फिरवल्याने धंद्यावर मोठा परिणाम झाल्याचे भाजीविक्रेते सुदाम कुलवडे यांनी सांगितले. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे विक्रे ते डी.जे. पुरोहित यांनी मात्र बदललेल्या नियमाचे स्वागत केले आहे. यामुळे सर्वांनाच पैसे मिळतील. त्यातच पैसे काढणाऱ्यांच्या बोटांवर शाई लावण्याचा निर्णय घेतल्याने काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेला आळा बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. रिक्षाचालक वासुदेव म्हसकर यांनीही नियमबदलाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे भ्रष्टाचाराला खऱ्या अर्थाने चाप बसेल. मात्र, नोटांचा वापर करण्यास सरकारने मुदत वाढवली असलीतरी काही पेट्रोलपंपांवर त्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम साडेचार हजारांपर्यंत नोटा बदलून मिळत होत्या. आता बदलाची मर्यादा दोन हजारांपर्यंत आणली आहे. आधीच बँकांना पैशांचा पुरवठा कमी प्रमाणात होत असताना घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे सर्वांनाच पैसे मिळतील, अशी आशा गृहिणी राजश्री खोत यांनी व्यक्त केली. दरम्यान, राष्ट्रीय बँका वगळता अन्य बँकांना रिझर्व्ह बँकेकडून योग्य त्या प्रमाणात पैशांचा पुरवठा केला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही बँकांच्या बाहेरची गर्दीही काही प्रमाणात रोडावली आहे. पैसाच नसल्याने काही बँकांची एटीएम मशीन बंद आहेत. त्यामुळे काही खातेदारांचा पैसे भरण्याकडेच कल दिसत आहे. (प्रतिनिधी)>परिस्थिती स्थिरावेलपुढील आठवड्यापर्यंत उद्भवलेली परिस्थिती स्थिर होईल, अशी आशा नागरिकांना आहे. >क्रेडिट, डेबिटकार्डचा वापर वाढलानोटा स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याने मोठ्या स्टोअर्समध्ये तसेच पेट्रोलपंपांवर क्रेडिट आणि डेबिटकार्डचा वापर ग्राहकांकडून होत आहे.