डोंबिवली : शनिवारी मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाच्या ताफ्यासह डोंबिवलीत विकास परिषदेला आले होेते. जिमखान्यातील त्या उपक्रमानंतर देवेंद्र फडवणीस यांनी पूर्वेतील कानविंदे व्यायामशाळेच्या पहिल्या मजल्यावर संघाच्या जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या चर्चेत जे काही झाले ते स्वयंसेवकांनी अन्य स्वयंसेवकांना सांगितले गेलेले नाही. तसेच थेट मुख्यमंत्री उघडउघडपणे भेटीला येणे हे ज्येष्ठ स्वयंसेवकांना तितकेसे रुचलेले नाही. याची कुजबुज नेहरू मैदानासह अन्य ठिकाणच्या प्रभात शाखांमध्ये सुरू आहे. एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने ‘लोकमत’जवळ यासंदर्भात उघडउघड नाराजी व्यक्त केली. अशी पद्धत कधीपासून सुरू झाली असा सूर आळवत ते म्हणाले की, जे झाले ते योग्य नाही. राजकारणाशी संबंध नाही असे एकीकडे म्हणताना गुप्त बैठक का घेतली गेली? जर मुख्यमंत्री स्वयंसेवक आहेत तर त्यांनीही अशी चर्चा का केली? तसेच जे आमदार-खासदार स्वयंसेवकांनीही मतदान करून निवडून दिले आहेत त्या आमदारांना त्या चर्चेपासून अलिप्त का ठेवले गेले? जर असलेल्या लोकप्रतिनिधींबाबत विश्वास नसेल तर त्या मतदारसंघांमध्ये ‘सशक्त’पणे काम कसे काय केले जाणार, असे सवाल करण्यात आले.युतीचा चेंडू लोकल कोर्टात डोबिंवली- केडीएमसीच्या रिंगणात युतीची चर्चा सुरू असतानाच मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा निर्णय करायचा असल्यास स्थानिक पातळीवरील नेत्यांनी तो घ्यावा. यासंदर्भात शिवसेनेशी त्यांनी चर्चा करावी तसे आम्हाला कळवावे, त्यानुसार निर्णय घेण्यात येईल.भाजपाने पूर्वीपासूनच युतीसंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर नेत्यांना सांगण्यात आले आहे. - रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्षभाजपा वरमली! : शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकास परिषद उपक्रमात भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यानुसार युती तुटणार असे संकेत असतानाच मंगळवारी प्रदेशाध्यक्षांनी अशी भूमिका मांडल्याने भाजपा वरमली का? अशी चर्चा आहे.
संघाच्या काहींनाच मुख्यमंत्र्यांची भेट
By admin | Updated: October 7, 2015 02:09 IST