शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लढाईपूर्वीच काहींनी सोडले होते मैदान नारायण राणेंचा आरोप

By admin | Updated: November 5, 2014 04:46 IST

काही काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मैदान सोडून दिले होते. त्यांनी काम करणेही बंद केले होते. पराभूत मानसिकतेत अनेक जण होते

मुंबई : काही काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मैदान सोडून दिले होते. त्यांनी काम करणेही बंद केले होते. पराभूत मानसिकतेत अनेक जण होते, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केला. राणे यांनी नावे सांगण्यास नकार दिला; पण काँग्रेस श्रेष्ठींना अहवाल पाठवू, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणे आज पहिल्यांदाच गांधी भवनात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना वाट करून दिली. काँग्रेस उमेदवारांना पुरविण्यासाठी आलेल्या रकमेपैकी १० कोटींची चोरी झाल्याच्या वृत्ताबाबत माहिती नाही, असे सांगत उमेदवारांना पैसे पोहोचविण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर होती, असा सूचक इशाराही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केला. उमेदवारांना पक्षातर्फे पुरेसा निधी का पोहोचला नाही, साधनसामुग्री का पुरविली गेली नाही आणि नीट प्रचारसभादेखील का देण्यात आल्या नाहीत, याची चौकशी काँग्रेस श्रेष्ठींनी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली.काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ६ नोव्हेंबरला होणार आहे. सध्या चर्चेतील एकाही नेत्याला काँग्रेसचा नेता म्हणून निवडू नये, असे सांगत राणेंनी एकप्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांनाच लक्ष्य केले. आघाडी तुटली तेव्हाच दोन्ही पक्षांचा पराभव आपल्याला दिसला होता, असेही ते म्हणाले. प्रचार समितीचा प्रमुख म्हणून पराभवाची नैतिक जबाबदारी आपलीही आहे, असे ते म्हणाले.