शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी काही वर्षे सोसा हालअपेष्टा

By admin | Updated: August 25, 2014 03:39 IST

वीर ते करंजाडीदरम्यान रविवारी मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जाणा-या कोकणवासीयांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले

सुशांत मोरे, मुंबईवीर ते करंजाडीदरम्यान रविवारी मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जाणा-या   कोकणवासीयांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. एकच रेल्वेमार्ग असल्याने अशा घटना घडल्यानंतर कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे दुहेरी मार्गाची मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे. मात्र दुहेरी मार्गाचा केवळ सर्व्हे पूर्ण झाला असून, त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर होणे बाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आणखी काही वर्षे अशाच प्रकारच्या हालअपेष्टांना सामोर जावे लागणार आहे. पावसाळ्यात किंवा ऐन सणासुदीच्या दिवसांत कोकण रेल्वेमार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास रेल्वेसेवा ठप्प होते. १४ एप्रिल रोजी संगमेश्वर-उक्शीदरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले. यामुळे कोकण रेल्वे तब्बल २३ तासांनंतर पूर्ववत झाली. तर त्यानंतर ४ मे रोजी दिवा-सावंतवाडी ट्रेनला नागोठणेजवळ मोठा अपघात झाला. त्या वेळीही कोकण रेल्वे १९ तासांनंतर पूर्ववत झाली. करंजाडीजवळ झालेला या मार्गावरील तिसरा अपघात आहे. अपघातानंतर रेल्वेसेवा अंशत: सुरूच ठेवण्यासाठी दुहेरी मार्ग आवश्यक आहे. मात्र दुहेरी मार्ग नसल्याने अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा होतो. दरम्यान, मध्य रेल्वेने त्यांच्या मार्गावर दुहेरीकरणाचे काम हाती घेतले असून, पेण ते कासू साधारण चार महिन्यांत तर कासू ते रोहापर्यंत साधारण सहा ते आठ महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतरचा टप्पा हा कोकण रेल्वेचा असून कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण केले जाणार आहे. हे दुहेरीकरण संपूर्ण न करता टप्प्याटप्यात केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल आणि त्याचा अहवाल बनवून रेल्वे बोर्डाला सादर केला जाईल. मात्र यासाठी निश्चित कालावधी ठरवला नसल्याने कोकणवासीयांच्या हालअपेष्टा आणखी काही वर्षे सुरूच राहतील, हेच दिसून येते.