शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या प्रेरणेने प्रश्न सोडवू

By admin | Updated: February 25, 2017 23:09 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला महाराष्ट्रात नेत्रदीपक असे यश निवडणुकीत मिळाले आहे. यापुढेही राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी

महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला महाराष्ट्रात नेत्रदीपक असे यश निवडणुकीत मिळाले आहे. यापुढेही राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करून राज्याचा विकास करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा, पंचायत समितीमधील विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सकाळी किल्ले रायगडावर आलेले होते. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. प्रशांत ठाकूर, कोकण विभागीय आयकर प्रभाकर देशमुख व जिल्हाधिकारी शीतल उगले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.महाड औद्योगिक वसाहतीतील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री रायगड किल्ल्याकडे रवाना झाले. त्यानंतर रोपवेने गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी प्रथम मेघडंबरी, होळीच्या माळावरील शिवपुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर शिवरायांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्री नतमस्तक झाले. ‘रायगडच्या मातीत तेज आणि प्रेरणा आहे, त्यातूनच मला राज्यात रयतेचे राज्य आणण्याची खरी प्रेरणा मिळाली आहे. या शिवप्रेरणेतूनच महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेऊ,’ असेही फडणवीस यांनी सांगितले. या वेळी राजकारणावर बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)