शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पडीक जमिनीवर उभारला सौरऊर्जा प्रकल्प

By admin | Updated: February 22, 2016 02:17 IST

दुष्काळामुळे होरपळणाऱ्या मराठवाड्यातील लातुरात दोन शेतकऱ्यांनी आपल्या पडीक जमिनीत उभ्या केलेल्या प्रकल्पांतून सौरशेतीचा आदर्श घालून दिला आहे. या दोन शेतकऱ्यांच्या

- बाळासाहेब जाधव,  लातूरदुष्काळामुळे होरपळणाऱ्या मराठवाड्यातील लातुरात दोन शेतकऱ्यांनी आपल्या पडीक जमिनीत उभ्या केलेल्या प्रकल्पांतून सौरशेतीचा आदर्श घालून दिला आहे. या दोन शेतकऱ्यांच्या ९२ एकर शेतीत महिन्याला साधारणपणे सव्वा कोटी रुपयांच्या विजेचे उत्पन्न घेतले जात आहे.उद्योजक शेतकरी राजेश्वर बुके यांनी औसा तालुक्यातील गोंद्री येथील आपल्या ४० एकर खडकाळ जमिनीवर ५.६४ मेगावॅटचा सौरप्रकल्प उभा केला. या प्रकल्पाची गुंतवणूक ३७ कोटींच्या घरात गेली. गवताचे कुसळही न येणाऱ्या या जमिनीला यामुळे सोन्याचेच दिवस आले. वर्षभर १५ कर्मचारी मोजक्या तांत्रिक कामांसह सौरऊर्जेच्या प्लेटवरील फक्त धूळ झटकायला होते. प्रकल्पातून दिवसाला २७ हजार युनिट इतक्या विजेची निर्मिती होते़ कंपनीचा केंद्र सरकारशी २० वर्षांचा खरेदीकरार आहे.दुसरे शेतकरी गणपतराव मोरगे यांनी निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे ५२ एकरवर १० मेगावॅटचा सौरऊर्जेवरील प्रकल्प उभा केला. त्यांच्या या प्रकल्पातून दिवसाला ४५ हजार युनिटची वीजनिर्मिती होते. या प्रकल्पाला ६२ कोटी रुपये खर्च आला. या प्रकल्पात ७ रुपये ४५ पैसे दराने वीज विकली जाते. यापोटी दर महिन्याला तब्बल ६८ लाख रुपये उत्पन्न मिळते.सौरऊर्जेत मराठवाडा हब बनेल !मराठवाडा हा डोंगरी भाग आहे. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी ओसाड आणि डोंगराळ शेती आहे. पडीक जमिनीचे क्षेत्रही इतर विभागांच्या तुलनेने मोठे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सूर्याचा प्रकाश जास्त असल्याने तापमानही सौरऊर्जेला पोषक आहे. असे प्रकल्प उभारल्यास मराठवाडा सौरऊर्जेच्या बाबतीत हब होईल, असा विश्वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला़ केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मिशनच्या योजनेतून या दोन्ही शेतकऱ्यांना टेंडर मिळाल्याने त्यांची वीज केंद्र सरकार खरेदी करते. दररोजचे उत्पादन ते महावितरणला देतात, अशी माहिती लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता बी़ ए़ वासनिक यांनी दिली़