शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : मतमोजणीस प्रारंभ, त्रिशंकू परिस्थिती, भाजप-शिवसेनेचे उमेदवार आघाडीवऱ़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 10:04 IST

सोलापूर : मतमोजणीस प्रारंभ, त्रिशंकू परिस्थिती, भाजप-शिवसेनेचे उमेदवार आघाडीवऱ़़

सोलापूर : मतमोजणीस प्रारंभ, त्रिशंकू परिस्थिती, भाजप-शिवसेनेचे उमेदवार आघाडीवऱ़़आप्पासाहेब पाटील : आॅनलाईन सोलापूरसोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक मतमोजणीस प्रारंभ झाला आहे़ महापालिकेसाठी रामवाडी गोदामात मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे़ तर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीची मतमोजणी त्या त्या तहसिल कार्यालय परिसरातील शासकीय गोदामात सुरू करण्यात आली आहे़ प्रारंभीची परिस्थिती पाहता महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता येणार नाही हे मात्र नक्की आहे़दरम्यान, मतमोजणीच्या सुरूवातीस टपाली मतदान मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ सकाळी ७ वाजल्यापासूनच मतमोजणी केंद्रावर केंद्राध्यक्षांनी मतमोजणीच्या तयारीस सुरूवात केली आहे़ महापालिकेसाठी पहिल्या फेरीत ८,९, १, ४, १२, १६, १९, २२ या प्रभागाची मतमोजणीस प्रारंभ होणार आहे़ साधारण: तीन ते चार दिवसात महापालिकेचा निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ मतमाजेणीच्या सुरूवातीस टपाली मतदान मोजण्यात आले़ त्यात प्रभाग ८ मधील १६ टपाली मते बाद झाली़ महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी तीन फेऱ्यात व तीन तासात सर्व जागांचा निकाल घोषित होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. महापालिकेच्या १०२ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. शहरातील ८९६ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया शांततेत पार पडली. यात ६२३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. २६ प्रभागांसाठी ९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे़ या ईव्हीएम मशीन रामवाडी गोदामातील स्ट्राँगरूममध्ये सीलबंद ठेवण्यात आल्या होत्या़ या गोदामाभोवती पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास या मशीन बाहेर काढण्यात आल्या आहेत़ प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे मतमोजणीसाठी प्रत्येकी १५ टेबलवर मतमोजणी होत आहे़ प्रत्येक प्रभागासाठी साधारणपणे तीन फेऱ्यात निकाल जाहीर होणार आहे. अशा तीन फेऱ्यात सर्व मतमोजणी पूर्ण होणार आहे़असे असेल मनपातील पक्षनिहाय संख्याबळभाजप 32 , काँग्रेस 28 , शिवसेना 25 , राष्ट्रवादी 08 ,माकप बसपा व इतर 09