शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात दीडशे कोटींच्या मालमत्तेवर टाच

By admin | Updated: September 26, 2015 01:37 IST

वारंवार नोटिसा बजावूनही कर्जाची परतफेड न करणारे विविध बँकांचे थकबाकीदार तसेच जामीनदारांच्या मालमत्तांचा ताबा घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला़

सोलापूर : वारंवार नोटिसा बजावूनही कर्जाची परतफेड न करणारे विविध बँकांचे थकबाकीदार तसेच जामीनदारांच्या मालमत्तांचा ताबा घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला़ सुमारे २० कर्जदारांकडून एकूण १५० कोटींची रक्कम थकित असून यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबीय, महेश कोठे, विश्वनाथ भुतडा आदींच्या संस्थांचा समावेश आहे़जिल्हाधिकाऱ्यांनी २० कर्ज प्रकरणात निर्णय घेतला आहे़ आता त्या-त्या तालुक्यांतील तहसीलदार संबंधित मिळकतीचा ताबा घेऊन कब्जेपावती संबंधित बँकेच्या ताब्यात देतील़ जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली ही मोठी कारवाई आहे़ बँकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थकबाकीदार कर्जदाराचे प्रकरण सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कर्जदार किंवा त्यांचे जामीनदार यांच्या मालमत्तेचा ताबा घेऊन तो बँकेला हस्तांतरित करतात़ तहसीलदार सदर मिळकतीचा ताबा घेऊन कब्जेपावती बँकेला देतात, अशी तरतूद सेक्युरिटायजेशन अ‍ॅक्टमध्ये आहे.--प्रमुख कर्जदार आणि त्यांच्या रकमासोलापुरातील निवास स्पिनिंग मिलचे विजय जाजू यांनी अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी इंडिया यांच्याकडून ५७ कोटी ८३ लाख कर्ज घेतले, त्याची परतफेड न केल्यामुळे चिंचोळी एमआयडीसीमधील प्लॉट ए ५, ए ८ चा ताबा घेतला आहे़ शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज यांनी डीसीसी बँकेकडून १०़१६ कोटी कर्ज घेतले आहे़ मोहिते-पाटील कुटुंबीय यासाठी जामीनदार आहेत़ या कर्जापोटी यशवंतनगर येथील गट क्रमांक ७८/२, प्लॉट क्रमांक १०, २७८ चौरस मीटर, गट क्र ़ ५५/२/२ चे २ हेक्टर तसेच मंगळवेढा येथील ०़८३ हेक्टर क्षेत्र व प्लॅन्ट अ‍ॅण्ड मशिनरी, फॅक्टरी बिल्डिंग जप्त करून बँकेस ताबा दिला आहे़ रणजितसिंह सहकारी पशुपक्षी पालन संघाने देखील डीसीसीकडून १़७३ कोटी कर्ज थकीत ठेवल्यामुळे नातेपुते येथील गट नं़ ९५ आणि ९७ चा ताबा बँकेला देण्याचा निर्णय दिला आहे़एक्सेल कृषी प्रक्रिया प्रा़ लि़ पंढरपूर यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून २०़१० कोटी कर्ज घेतले होते़ त्याची परतफेड न केल्यामुळे पंढरपुरातील सुभाष भोसले कुटुंबीयांची विरंगुळा हॉटेल, भटुंबरे गावातील १़९१ हेक्टर जागा तसेच पंढरपुरातील ४ हेक्टर जागा ताब्यात घेऊन बँकेला दिला आहे़विष्णू गायत्री बायो कोल आणि अ‍ॅग्रो प्रोडक्ट्सचे सतीश धरणे यांनी बँक आॅफ महाराष्ट्र शंकरनगर, पुणे शाखेतून ११ कोटी कर्ज घेतले़ याला महेश कोठे जामीनदार आहेत़ त्यामुळे गंगेवाडी (द़ सोलापूर) येथील २ हेक्टर ९५ आरचा ताबा बँकेस देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे़