शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Solapur Election - एमआयएमची जोरदार मुसंडी, ८ जागांवर विजय

By admin | Updated: February 23, 2017 16:00 IST

नवख्या एमआयएम पक्षानेही प्रथमत: निवडणुक लढवित जोरदार मुसंडी मारीत ८ जागांवर विजय मिळविला आहे़

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 23 - वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसचा किल्ला ढासळत भाजप व शिवसेनेने याठिकाणी जोरदार मुसंडी मारत मनपावर सत्ता स्थापन करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे़. तर नवख्या एमआयएम पक्षानेही प्रथमत: निवडणुक लढवित जोरदार मुसंडी मारीत ८ जागांवर विजय मिळविला आहे़
 
दरम्यान, प्रभाग २२ मधून एमआयएमच्या पूनम अजित बनसोडे, प्रभाग १४ मधून शाहिदाबानू इकबाल शेख, वाहिदाबाई कासीम शेख, रियाज इब्राहिम खारादी हे चार जण विजयी झाले असून उर्वरित चार जण विजयाच्या उंबरठ्यावर आहेत़ हेही उमेदवार विजयी झाले असून फक्त निवडणुक अधिकाºयांकडून विजय घोषित करणे बाकी उरले आहे़ 
 
यंदा एमआयएम पक्षाने प्रथमच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उतरले होते़ एमआयएमच्यावतीने वातावरण निर्माण करण्यासाठी पक्षाने खा़ असोउद्दीन ओवेसी व आ़ अकबोरोद्दीन ओवेसी यांच्या सभा झाल्या़ या सभेत दोन्ही मातब्बर नेत्यांनी सोलापूरच्या विकासात मोलाची साथ देऊ असेही आश्वासन दिले होते़ एमआयएमच्या विजयी उमेदवारांनी शहरात विजयाचा जल्लोष करीत आनंद व्यक्त केला़ ढोल, ताशांच्या गजरात एमआयएमच्या उमेदवारांनी मिरवणुक काढली़ सोलापूरच्या मतमोजणीस सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला़ सुरूवातीच्या काळात टपाली मतदान मोजणी झाली़ मतमोजणी केंद्रावर पोलीसांची चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़